T20 विश्वचषक अपडेट : आयसीसी T-२० विश्वचषकच्या मुख्य स्पर्धांना आज पासून सुरूवात..!! नवी मुंबई (बातमी/दुबई) :- आयसीसी T-२० विश्वचषकच्या मुख्य स्पर्धांना आज पासून सुरूवात होत आहे. पण वर्ल्डकपमधील सर्वात चुरशीची लढत ही २४ ऑक्टोबर रोजी म्हणजेच आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या लढतीची उत्सुकता वाढत चालली असून काही चाहत्यांना प्रत्यक्ष मैदानात जाऊन हा सामना पाहता येईल. तर अन्य कोट्यवधी चाहते टीव्हीवरून हा सामना पाहतील. भारत आणि पाकिस्तान ही लढत हायव्होल्टेज मानली जाते. दोन्ही देशातील चाहते याकडे युद्धाप्रमाणे पाहतात. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्धच्या सर्व लढती जिंकल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या पाच लढतीत पाकिस्तानचा पराभव झाला असून टीम इंडिया यावेळी सहाव्या विजयासाठी उत्सुक असेल. दोन्ही देशातील हा सामना पाहण्यासाठी पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी चक्क 2 दिवसांची सुट्टी काढली आहे. पाकिस्तानचे अंतर्गत मंत्री शेख रशीद यांनी पत्रकारांना सांगितले की, T-२० वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान मॅच पाहण्यासाठी मी सुट्टी काढली आहे आणि स्टेड...