Skip to main content

न्यूज अपडेट : नकली दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनामुळे वाढत आहे कर्करोगाचा धोका:

न्यूज अपडेट : नकली दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनामुळे वाढत आहे कर्करोगाचा धोका:

● मिठाईच्या समाप्त तारखेच्या नियमांबाबत सामान्य नागरिक बेफिकिर

ठाणे (प्रतिनिधी/ अक्षय तांडेल) :-  सध्या महाराष्ट्रात सण -उत्सवाचे दिवस सुरु असून या काळात मिठाई व इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन वाढते, अनेक नागरिक आपल्या घराजवळील दुकानांमधून मिठाई व इतर पदार्थ विकत घेत असतात पंरतु हे दुग्धजन्य पदार्थ बनविण्यासाठी असली दुधाचा वापर झाला आहे का याबाबत त्याना माहिती नसते. मुंबई व लगतच्या शहरांमध्ये नकली दूध बनविणाऱ्या टोळ्या कार्यरत असून पोलीस व सरकारी यंत्रणा यांच्यावर योग्य ती कारवाई करत असते परंतु या सर्व प्रकारांमुळे  सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. 

याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.अभय गायकवाड सांगतात," अशुद्ध पाण्याच्या भेसळीमुळे दुधातील स्निग्धांश तर कमी होतो परंतु जुलाब, उलट्या, जंत, आतड्याचे विकार, टायफॉईड, नारू, सिस्टोसोमियासीस असे आजार होतात. तसेच त्यांच्या साथी देखील मोठ्या प्रमाणात पसरू शकतात. दुधामध्ये फक्त पाण्याचीत भेसळ होते असे नाही, तर त्यात त्याहूनही अधिक घातक पदार्थ मिसळले जातात. लोणी,तूप यांसारखे दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी दुधातून मलई(फॅट) काढून घेतली जाते. त्यामुळे दुधातील स्निग्धांशाचे(फॅटचे) प्रमाण कमी होते, दूध खरेदीच्या तपासणीत फॅट कमी आढळल्याने ते डेअरीमध्ये  नाकारले जाते. हे टाळण्यासाठी दुधात युरिया,स्टार्च, ग्लुकोज व अन्य पदार्थ मिसळून फॅटचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. दुधात डिटर्जंट, युरिया कॉस्टिक सोडा, ऍसिडस्, अमोनियम सल्फेट,मेलामाइन, स्टार्च-साखर-तवकील यांसारख्या रासायनिक पदार्थांची सर्रासपणे भेसळ केल्यामुळे किडनीचे आजार व कर्करोगाचा धोका वाढतो. 

भारतात आज २५ ते ३० लाख कर्करुग्ण आहेत. दरवर्षी यात १२ लाखांची भर पडते. दरवर्षी सात लाख रुग्णांचा यामुळे जीव जातो त्यामुळे आपण भेसळयुक्त अन्न अथवा दुग्धजन्य पदार्थांपासून कसे मुक्त राहू यावर मंथन करणे गरजेचे आहे. आता सरकारी नियमाप्रमाणे मिठाईवर सुद्धा समाप्त तारीख लिहिणे गरजेचे आहे पंरतु अनेक नागरिक यावर लक्ष देत नाहीत व पैसे देऊन आजार विकत घेतात."

दुधातील मोठ्या प्रमाणात होणारी भेसळ लक्षात घेवून भारत सरकारने १९५४ साली अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा करून शिक्षेची तसेच दंडाची तरतूद केलेली आहे.  इंडियन कौन्सिल फॉर मेडिकस रिसर्च ‘आयसीएमआर’ संस्थेने केलेल्या अभ्यासात दूध भेसळीमुळे क्षयरोग होत असल्याचे दिसून आले. तसेच दुधात युरियाची भेसळ असल्यास त्याचा मूत्रपिंड, यकृत व हृदयावर परिणाम होत असून कॉस्टिक सोडय़ामुळे लहान मुलांच्या शारीरिक वाढीवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे अशी माहिती सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अभय गायकवाड यांनी दिली.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...