Skip to main content

T20 विश्वचषक अपडेट : टीम इंडिया आज दुबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत सामना:

T20 विश्वचषक अपडेट : टीम इंडिया आज दुबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत सामना:

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- टीम इंडिया रविवारी 24 ऑक्टोबरला दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा सामना करून T20 विश्वचषक (T20 WC 2021) मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. या हाय-व्होल्टेज मॅचवर जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे भारत वर्ल्डकपमध्ये (वनडे आणि टी -20) पाकिस्तानकडून पराभूत झाला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रविवारी टीम इंडिया हा विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. आम्ही या सामन्याशी संबंधित महत्त्वाची माहिती देत ​​आहोत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना कधी आणि कुठे होणार?

आयसीसी T20 विश्वचषकात, भारत आणि पाकिस्तानचे संघ रविवार, 24 ऑक्टोबर रोजी आमनेसामने येतील. हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. सामन्याची नाणेफेक सायंकाळी 7 वाजता होणार आहे.

लाईव्ह टेलिकास्ट कुठे पाहू शकतो?


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या वाहिन्यांवर पाहू शकाल. इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त, हे इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील पाहिले जाऊ शकते.

सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे बघायचे?


तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney+Hotstar) वर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. याशिवाय https://marathi.abplive.com/ वर तुम्हाला सामन्याचे लाईव्ह अपडेट्स मिळतील.

सराव सामन्यांमध्ये भारताची कामगिरी उत्तम -


T20 विश्वचषकापूर्वी भारताने त्यांचे दोन्ही सराव सामने जिंकले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये होते. पहिल्या सराव सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा 9 गडी राखून पराभव केला.

सराव सामन्यांमध्ये पाकिस्तानची कशी कामगिरी होती?

पाकिस्तानने दोन सराव सामने खेळले, एक जिंकला असून एकात पराभूत झाले. पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा सात गडी राखून पराभव केला, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा गड्यांनी पराभव पत्करावा लागला.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच पाहण्याची उत्सुकता फक्त सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांना नसते तर राजकीय लोकांना देखील असते.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि महत्त्वाचे आपली वेळ येताच कोविड वैक्सीन पूर्ण करून घ्या.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...