Skip to main content

ब्रेकिंग न्यूज: Whatsapp, Facebook आणि Instragram या सेवा जगभरात अनेक तास बंद...कोट्यावधीचे नुकसान पहा नक्की कसे ते..!!

ब्रेकिंग न्यूज:  Whatsapp, Facebook आणि Instragram या सेवा जगभरात अनेक तास बंद...कोट्यावधीचे नुकसान पहा नक्की कसे ते..!!

नवी मुंबई :- जगभरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सेवा अनेक तास बंद होत्या. मंगळवारी पहाटेपासून यातील एक एक प्लॅटफॉर्म पुन्हा सुरळित काम करू लागले. सोमवारी रात्री सुमारे 9 वाजून 15 मिनिटांनी तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाउन झाले होते. हे 3 प्लॅटफॉर्म तब्बल 7 तास डाउन राहिल्यानं जगभरातील वापरकर्त्यांना याचा चांगलाच फटका बसला. डाउन राहिल्यानं फेसबुकच्या शेअरमध्ये तब्बल 5 टक्क्यांची घसरण झाली. मात्र, इतके तास Whatsapp, Facebook आणि Instragram डाउन का होतं, हे कारण अद्यापही अजुनही समजलेलं नाही.

फेसबुकनं ट्विट करत म्हटलं, की जगभरातील लोक, व्यवसायिक आणि मोठा समुदाय जो आमच्यावर अवलंबून आहे, त्यांची माफी मागतो. आम्ही आमचे ॲप्स आणि सेवा पुन्हा सुरळित करण्यासाठी मेहनत घेत आहोत. आता हे सांगताना आनंद होत आहे, की या सेवा पुन्हा सुरळित सुरू झाल्या आहेत. आमच्यासोबत काम करण्यासाठी धन्यवाद.

फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांनी म्हटलं, की Whatsapp, Facebook, Instagram आणि Messanger पुन्हा ऑनलाईन झाले आहेत. या त्रासासाठी माफी मागतो. तुम्ही ज्या लोकांची काळजी करता त्यांच्यासोबत संपर्कात राहण्यासाठी तुम्ही आमच्या या सेवांवर किती अवलंबून आहात, याची आम्हाला कल्पना आहे.

फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी Mike Schroepfer यांनी ट्विट केलं की, या सेवा बंद झाल्यामुळे प्रभावित झालेल्या सर्वांची मी मनापासून क्षमा मागतो. आम्ही नेटवर्किंग समस्या अनुभवत आहोत आणि टीम शक्य तितक्या लवकर या सेवा सुरू करण्यासाठी काम करत आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, की फेसबुक सेवा पुन्हा सुरू झाली आहे. 100 टक्के सुरळित सुरू होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल. प्रत्येक लहान-मोठे व्यवसायिक, कुटुंब आणि आमच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीची माफी मागतो.

याआधी सोमवारी रात्री फेसबुकनं म्हटलं होतं, की आम्हाला माहिती आहे, की काही लोकांनी आमच्या ॲप्सचा वापर करण्यात अडचणी येत आहेत. आम्ही ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणत्याही असुविधेसाठी क्षमा मागतो.

काही तासात झुकेरबर्ग यांचं 5,21,90,70,50,000 चं नुकसान Facebook चे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांची वैयक्तिक संपत्ती काही तासांत सुमारे 7 अब्ज डॉलर्सने कमी झाली आहे. भारतीय रुपयानुसार ही किंमत 5,21,90,70,50,000 रुपये इतकी होते. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांच्या नंबर घसरला आहे. सोमवारी WhatsApp, Facebook, Instagram हे फेसबुक संकलित सोशल मीडिया Apps तब्बल 7 तास बंद झाल्याने हा मोठा फटका बसला. फेसबुक संकलित सोशल मीडिया Apps तब्बल 7 तास बंद झाल्याने फेसबुकचा स्टॉक 5 टक्क्यांनी घसरला आणि सप्टेंबरच्या मध्यापासून आतापर्यंत सुमारे 15 टक्के कमी आली.

सोमवारी स्टॉक स्लाइडनुसार, झुकेरबर्ग यांची संपत्ती 120.9 बिलियनपर्यंत खाली आली आणि ते बिल गेट्स यांच्या खाली 5 व्या क्रमांकावर आले. 13 सप्टेंबरपासून त्यांनी जवळपास 19 अब्ज संपत्ती गमावली आहे, ज्याची किंमत सुमारे 140 बिलियन डॉलर्स होती.






महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...