कोरोना महासंकट : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला १० वारकऱ्यांसह आषाढी वारीसाठी पंढरपूरला रवाना; पोलीस आणि आरोग्य पथक सहभागी असणार:
कोरोना महासंकट : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला १० वारकऱ्यांसह आषाढी वारीसाठी पंढरपूरला रवाना; पोलीस आणि आरोग्य पथक सहभागी असणार: श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी बस मध्ये ठेऊन ३० जूनला पालखी महामार्गाने पंढरपूरला घेऊन जाणार, यामध्ये सहभागी असणारे सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना विषाणू तपासणी केली जाणार असून फक्त १० जणांनाच जाण्यास परवानगी मिळणार आहे. त्यासोबत पोलीस आणि आरोग्य विभागाचेही पथक सोहळ्याबरोबर असणार आहे. नवी मुंबई (बातमी-देहूगाव) : यंदाच्या २०२० च्या आषाढीवारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी बस मध्ये ठेऊन ३० जूनला पालखी महामार्गाने पंढरपूरला घेऊन जाणार आहेत, यामध्ये सहभागी असणारे सेवेकरी आणि मानकरी यांची कोरोना विषाणू तपासणी केली जाणार असून फक्त १० जणांनाच जाण्यास परवानगी मिळणार आहे. त्यासोबत पोलीस आणि आरोग्य विभागाचेही पथक सोहळ्याबरोबर असणार आहे. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने यंदा वारकरी संप्रदायाने आषाढी पायी वारी सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आषाढीवारीसाठी विविध संताच्या पालख्या पंढरपूरला येतात. संतांच्या ...