Skip to main content

कोरोना महासंकट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद ; जून ३० नंतर लॉकडाऊन उठणार नाही :

कोरोना महासंकट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद ; जून ३० नंतर लॉकडाऊन उठणार नाही :



नवी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज २८ जून रोजी जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला, ३० जूनला लॉकडाऊन उठणार नाही, काळजीपूर्वक काही गोष्टी सुरु करत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी ते म्हणाले की, कोरोना विषाणूंची संख्या वाढत आहे. भाजी मंडईसह काही ठिकाणी होणारी गर्दी हा चिंतेचा विषय आहे. जर तुम्ही गर्दी कराल तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असेही ते म्हणाले. काही जिल्ह्यांमधून समोरुन लॉकडाऊन वाढवण्याची मागणी आली आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यावेळेस म्हणाले. लॉकडाऊन हा शब्द मी वापरत नसलो तरी काही बंधनं मात्र आपल्याला स्वत:वर घालावी लागतील, आपल्याला शिस्तीची जास्त गरज आहे. मुलांची, ज्येष्ठांची काळजी घेताना तरुण बाहेर पडत आहेत. त्यांना लक्षणे दिसत नसली तरी त्यांच्यामुळे अन्य लोकांना बाधा होऊ शकते. काळजी घेणे अपरिहार्य आहे, असं ते म्हणाले आहेत. आपण जे मिशन बिगेन अगेन सुरु केलंय पण धोका टळलेला नाही. आपण कात्रीत सापडलो आहोत. पण आपल्याला संकटावर मात ही करायची आहे. एखादी गोष्ट उघडली म्हणजे धोका टळलाय असं नाही, असं ते यावेळेस म्हणाले.


शेतकऱ्यांचा मुद्दा : 
बोगस बियाणांच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, शेतकरी अपार कष्ट करुन बियाणं पेरतो आणि ते उगवत नाही. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं त्यांच्यावर कारवाई होणार. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलं त्यांच्याकडून वसूली करुन नुकसानभरपाई देणार असल्याचे ठाकरे म्हणाले. शेतकरी मरमर राबून, अफाट मेहनत करून अन्न पिकवतोय आपल्यासाठी. त्या संदर्भात बी - बियाणं बोगस असल्याच्या तक्रारी येणे हे दुर्दैवी. मेहनत करून पीक आलं नाही तर काय करणार? मी शेतकरी दादाला सांगतो, काळजी करू नका, असंही ते म्हणाले.


कोरोना संकटात सोळा हजार कोटींचा करार :  
कोरोनाच्या संकटातही सुमारे सोळा हजार कोटींचे करार महाराष्ट्राने केले आहेत. नवीन उद्योगधंदे आल्यावर अर्थचक्राला गती आणि माझ्या भूमीपुत्रांना रोजगार उपलब्ध होईल. कोरोना एके कोरोना असे आपण करीत नाही आहोत. काही अटीतटी - शर्थी जटील न ठेवता आपण त्यांचे स्वागत करीत आहोत. उद्योजकांनो, महाराष्ट्रात या, तुमचे स्वागत आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक करा, असं आवाहन त्यांनी केलं.


लॉकडाऊनचा नेमका अर्थ काय...???
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपणहून कोविडला बळी पडू नका. सुरक्षित अंतर ठेवा, हात तोंडाला सारखे लावू नका. सुविधा, शिथिलता ह्या आरोग्यासाठी दिल्या आहेत, आजाराला बळी करण्यासाठी नाही. गरज नसताना बाहेर पडलात तर परत लॉकडाऊन करावे लागेल. आता प्रश्न तुम्हांला आहे, लॉकडाऊन करायचे का? असा सवाल त्यांनी केला.


पावसाळा चालू झाला आहे सर्वानी काळजी घ्यावी:
तसेच ते पुढे म्हणाले की, शहरी भागात मी विशेष सांगतो, हे जे पावसाळ्याचे दिवस आहेत हे मलेरिया व डेंग्युचे दिवस आहेत. आपली यंत्रणा आज कोविड विरुद्धच्या युद्धात गुंग आहेत. व्यग्र आहेत. सर्वांना विनंती आहे, कुठेही पाणी साठू देऊ नका. डेंग्युच्या आळ्या ह्या अगदी एका बुचातील साठलेल्य पाण्यापासुन कोठेही होऊ शकतात. आता पावसाळा सुरू झालेला आहे. नवीन अंकुर येतात, पालवी फुटते, हिरवे गालिचे पसरतात. पावसाळा एक नवीन जीवन घेऊन येतो. आणि या चांगल्या गोष्टींसह काही वाईटही घेऊन येतो. त्या दृष्टीने येणार्‍या नैसर्गिक आपत्ती जसे पूर, वादळ , साथीचे रोग घेऊन येतो. आपण त्या धरतीवरही तयारी करत आहोत, असं ते म्हणाले.


प्लाझ्मा थेरपीचा वापर कसा???
उद्या कदाचित प्लाझ्मा थेरपीचा वापर करणारे आपले राज्य पहिले ठरेल. प्लाझ्मा हा कोणाचा वापरू शकतो? कोरोना होऊन बरे झालेत, त्यांच्या शरीरात ॲन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत त्या रक्तगटानुरुप आपण वापरू शकतो. रक्तदानाप्रमाणे कोरोना बरा होऊन घरी गेलेल्या रुग्णांना विनंती आहे प्लाझ्मादान नक्की करा.


डॉक्टर आणि शेतकरी यांना धन्यवाद : 
उद्धवजी पुढे म्हणाले की, १ तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे. तसेच वसंतराव नाईक यांची जयंती देखील आहे. हा आठवडा शेतकरी सप्ताह म्हणून साजरा करु. शेतकरी आणि डॉक्टरांसाठी हा दिवस साजरा करुन त्यांच्या कार्याला सलाम करुयात, असं ही ठाकरे यांनी म्हटलं आहे. योगायोगाने १ तारखेला राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे आणि त्याच दिवशी शेतकरी दिन आहे जो आपले माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्मरणार्थ साजरा करतो. त्यांना अभिवादन करुन शेतकर्‍यांना, अन्नदात्याला मी सलाम करतो, धन्यवाद देतो. परवा १ तारीख आहे, त्या दिवशी आपल्यासाठी लढणार्‍या सर्व डॉक्टर्स चा दिवस आहे. मी त्यांना धन्यवाद देतो व आपण त्यांच्यासोबत ठामपणे उभे राहु असे वचन देतो.



मुख्यमंत्री स्वता आषाढीच्या वारीला जाणार:
मुख्यमंत्री म्हणाले की, तुमच्या वतीने मी आषाढीच्या वारीला जाणार आहे. केवळ महाराष्ट्रासाठी नाहीतर अवघ्या देशासाठी, जगासाठी निरोगी आयुष्यासाठी साकडे घालणार आहे. वारकर्‍यांनो तुमचे आशीर्वाद पाठीशी राहु द्या, तुमचे आशीर्वाद घेऊन तुमच्या वतिने मी विठुरायाचे आशीर्वाद घ्यायला जातोय. मी वारी हेलिकॉप्टरमधुन एरियल फोटोग्राफीद्वारे केली. मला त्या अथांग अवकाशातुन सर्व विसरुन विठुमाऊलीच्या गजरात दंग झालेल्या वारकऱ्यांच्या रुपातुन मला विठ्ठलाचे दर्शन झाले, विश्वरुप दिसले. वारकर्‍यांना सांगतो, नाईलाजास्तव वारीचा सोहळा आटोपशीर करावा लागतोय, असं ते म्हणाले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे व विषय: 


१)अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नका.


२)बोगस बियांणाच्या तक्रारी येत आहेत हे दुर्देवी.


३)उरलेल्या शेतकऱ्यांना लवकरच कर्जमुक्ती दिली जाणार.


४)मी आषाढी वारीला पूजेसाठी जाणार. विठुरायाला साकडं घालण्यासाठी मी जाणार आहे.


५)दहिहंडी उत्सव स्वताहून रद्द केला. ही खरी सामाजिक जाणीव.


६)गणेशोत्सव मंडळांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद


७)विसर्जनाची किंवा प्रतिष्ठापनेची मिरवणूक काढू नका


८)मूर्ती लहान करण्याचा निर्णय कौतुकास्पद


९)प्लाझ्मा थेरपीचा उपयोग करणारं देशातलं सर्वात मोठं राज्य महाराष्ट्र असेल


१०)कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढं यावं


११)लढणं हे आपल्या रक्तात आहे, आता रक्तदान करुन आपला लढाऊपणा सिद्ध करा


१३)रेमडेसिवीर आणि अन्य औषधं मोफत उपलब्ध करुन देणार


१४)चेस द व्हायरस ही संकल्पना मुंबईत सुरु


१५)अद्याप कोरोनाचं संकट टळलेलं नाही


१६)अर्थचक्राला गती दिल्यानंतर कोरोना संख्या वाढणारच आहे


१७)ज्येष्ठ डॉक्टरांनी काळजी घेऊन काम करावं


१८)पाऊस आला की नवचैतन्यासोबत काही समस्याही घेऊन येतो, मात्र आपली तयारी सुरु आहे


१९)या दिवसात अन्य रोगांचीही भीती आहे, त्यामुळं काळजी घ्या


२०)उद्योजकांसाठी महाराष्ट्राचं दार उघडं, संकटामध्ये उद्योजकांना महाराष्ट्र आपला वाटतो. तुम्ही या पण भूमिपुत्रांना रोजगार द्या


२१)शाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षण सुरु करण्यावर भर.


 


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...