Skip to main content

कोरोना महासंकट : भारताने लडाखमध्ये T-90 भीष्म टँक तैनात; चीनला उत्तर देण्यास तयार: 

कोरोना महासंकट : भारताने लडाखमध्ये T-90 भीष्म टँक तैनात; चीनला उत्तर देण्यास तयार: 


चीनने सीमेजवळ काही टँक आणल्याची माहिती मिळाली आहे. चीनकडे T-95 टँक आहे. जो भारतातील T-90 टँकच्या बरोबरीचा आहे. त्यामुळे चीनच्या या टँकला भीष्म उत्तर भारत देऊ शकतो. 



नवी मुंबई : गलवान संघर्षानंतर भारताने लडाखमध्ये सर्वात शक्तीशाली मानला जाणारा टँक T-90 भीष्म टँक तैनात केला आहे. भीष्म हा जगातील सर्वात अचूक मारा करणारा टँक मानला जातो. लडाखमध्ये T-90 टँकची तैनाती भारत कशा प्रकारे चीनला उत्तर देण्यासाठी तयार आहे हे दाखवतो. T-90 च्या पूर्व लडाखमध्ये भारतीय लष्कराने जबरदस्त तयारी करणयात आली आहे. 


भारत देशात चीनसोबत सुरु असलेला तणाव वाढला आहे. आता चीनवर विश्वास ठेवणं देशाला घातक ठरु शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार, चीनने सीमेजवळ काही टँक आणल्याची माहिती आहे. चीनकडे T-95 टँक आहे. जो T-90 टँकच्या बरोबरीचा आहे. त्यामुळे चीनच्या या टँकला भीष्म उत्तर देऊ शकतो. त्यामुळे भारताने हा टँक तेथे तैनात केला आहे.



T-90 चे वैशिष्ट्य : 
- भारताचा प्रमुख युद्ध टँक
- जैविक आणि रासायनिक हत्यारांचा सामना 
- हे टँक रशियाने बनवले होते.
- ६० सेकंदाच ८ गोळे फायर करु शकतो.
- टँकवर अचूक १२५ एमएमची मेन गन
- ६ किमीवर मिसाईल लॉन्च करण्याची क्षमता
- ४८ टन वजन, जगातील हल्के टँकमधील एक
- दिवस आणि रात्र लढण्याची क्षमता
- मिसाईल हल्ल्याला रोखणारं कवच
- शक्तिशाली १००० हॉर्स पॉवरचं इंजिन
- ७२ किमी प्रति तासचा वेग
- एका वेळेत ५५० किमी पर्यंत हल्ला करण्यासाठी सक्षम


टी -90 ही तिसरी पिढीची रशियन लढाईची टँक आहे जी १९९३ मध्ये सेवेत दाखल झाली. टँक टी -72B आधुनिक रूप आहे आणि टँक टी-80U वर सापडलेल्या बर्‍याच वैशिष्ट्यांचा समावेश आहे. मूळतः टँक टी - 72BU म्हटले जाते, परंतु नंतर त्याचे नाव बदलून टँक टी-90 ठेवले गेले, ही रशियन ग्राउंड फोर्सेस आणि नेव्हल इन्फन्ट्रर यांच्या सेवेत एक प्रगत टॅंक आहे.


लडाखमध्येच महत्त्वाचं का ?


१. भारत आणि चीन दरम्यान सीमा स्पष्ट नाहीत
२. भारतीय सीमेत चीनकडून घुसखोरी 
३. लडाखमध्ये सीमेवर असलेला तणाव
४. तिब्बतमध्ये चिनी सैन्याचे तैनात टँक
५. अक्साई चीनवर अवैध ताबा


काय आहे भारताची रणनीती : 


- लडाखच्या मोकळ्या मैदानात टँक हे महत्त्वपूर्ण शस्त्र
- लडाखच्या डेमचुक आणि स्पांगूर गॅपमध्ये वाळूमय जमीन
- वाळूमय जमिनीवर हे टँक वेगाने जावू शकतात.
- चीनचा महामार्ग डेमचॉक आणि स्पांगूर गॅपपासून ५० कि.मी.
- भारतीय टँकला या महामार्गाला लक्ष्य करता येणं सोपे



भारतीय टँक विरूद्ध चिनी टँक


- टी 90 भीष्म हे जगातील सर्वात मजबूत टँक आहे
- चीनपेक्षा भारतीय सैन्याकडे अधिक टँक आहेत
- भारतीय सैन्याकडे एकूण ४२९२ टँक
- चायना आर्मीकडे ३५०० टँक
- भारतीय सैन्यात चीनपेक्षा ८०० अधिक टँक


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...