न्यूईरा हॉस्पिटल्समध्ये प्रगत दंत उपचार विभागास सुरुवात; सर्व मौखिक समस्यांवर एकाच छताखाली मिळणार उपचार नवी मुंबई (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे): रुग्णसेवेला अधिक व्यापक व दर्जेदार स्वरूप देण्याच्या दिशेने न्यूईरा हॉस्पिटल्सने आपल्या रुग्णालयात प्रगत दंत उपचार विभाग सुरू केला आहे. या नव्या विभागामार्फत ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जरीसह संपूर्ण दंत उपचार सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.हा नवीन विभाग आधुनिक पायाभूत सुविधा, प्रगत उपकरणे आणि अनुभवी तज्ञांच्या टीम एकत्र आणत सर्वसमावेशक दंत सेवा प्रदान करते. नियमित दंत तपासणीपासून ते गंभीर मौखिक आणि मॅक्सिलोफेशियल( जबडा) शस्त्रक्रिया पुरवते ज्यामुळे नवी मुंबईरचकरांना आता अत्याधुनिक दंतसेवेचा लाभ घेता येणार आहे. श्री शशिकांत चांदेकर(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी पोलीस स्टेशन) यांच्या हस्ते या अत्याधुनिक विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. विनोद विज(वरिष्ठ प्लास्टिक सर्जन) आणि डॉ. कोपल विज(ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जन) यांची प्रमुख उपस्थिती होती. नव्याने सुरू झालेल्या या विभागात प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा, कॉस्मेटिक दंतचिकित्सा, ...
चिंध्रणमधील नव्या शाळेसाठी रेसोनिया लिमिटेडकडून रु. ५० लाखांचा निधी नवी मुंबई (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे): ग्रामीण भागातील शैक्षणिक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत रेसोनिया लिमिटेडने पनवेल यांनी तालुक्यातील चिंध्रण गावात नव्या माध्यमिक शाळेच्या इमारतीसाठी रु. ५० लाखांची आर्थिक मदत दिली आहे. ही मदत कंपनीच्या प्रमुख प्रकल्प मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड (MUML) अंतर्गत सुधागड एज्युकेशन सोसायटीला देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या नव्या शाळा इमारतीचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत उपस्थित होते. त्यांनी खासगी पायाभूत सुविधा विकासक आणि स्थानिक समुदाय यांच्यातील सहकार्याचे कौतुक केले. गावचे सरपंच एकनाथ नामदेव पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने निधी स्वीकारला. प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक गरजा ओळखून, मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेडने चिंध्रण गावातील शिक्षण क्षेत्राला पाठबळ देण्याचा निर्णय घेतला. आमदार प्रशांत ठाकूर आणि गाव प्रतिनिधींच्या विनंतीनुसार...