चिंध्रणमधील नव्या शाळेसाठी रेसोनिया लिमिटेडकडून रु. ५० लाखांचा निधी
नवी मुंबई (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे): ग्रामीण भागातील शैक्षणिक पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत रेसोनिया लिमिटेडने पनवेल यांनी तालुक्यातील चिंध्रण गावात नव्या माध्यमिक शाळेच्या इमारतीसाठी रु. ५० लाखांची आर्थिक मदत दिली आहे. ही मदत कंपनीच्या प्रमुख प्रकल्प मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड (MUML) अंतर्गत सुधागड एज्युकेशन सोसायटीला देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे स्थानिक विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या नव्या शाळा इमारतीचा भूमिपूजन सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत उपस्थित होते. त्यांनी खासगी पायाभूत सुविधा विकासक आणि स्थानिक समुदाय यांच्यातील सहकार्याचे कौतुक केले. गावचे सरपंच एकनाथ नामदेव पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने निधी स्वीकारला.
प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक गरजा ओळखून, मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेडने चिंध्रण गावातील शिक्षण क्षेत्राला पाठबळ देण्याचा निर्णय घेतला. आमदार प्रशांत ठाकूर आणि गाव प्रतिनिधींच्या विनंतीनुसार नव्या शाळेच्या इमारतीसाठी रु ५० लाखांचा भरघोस निधी देण्यात आला आहे.
रेसोनिया लिमिटेड शाश्वत विकासाच्या दिशेनेही सक्रिय असून, गुजरातमधील खावडा येथून महाराष्ट्रातील पडघा येथे हरित ऊर्जा पोहोचवणारा खावडा IV C वीज वहन प्रकल्प सध्या सुरू आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेकडे आणखी एक पाऊल पुढे टाकत आहे.
पायाभूत सुविधांपुरते मर्यादित न राहता, MUML आणि रेसोनिया लिमिटेड स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेलाही प्राधान्य देत आहेत. पालघर जिल्ह्यातील वाडा येथील गोवर्धन स्किल सेंटरमध्ये स्थानिक व आदिवासी भागातील ४० विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तीन महिन्यांची सशुल्क इंटर्नशिप मिळाली असून त्यांना दरमहा रु. १४,००० स्टायपेंड दिले जात आहे.
या प्रशिक्षणामध्ये लेथ मशीन, मिलिंग मशीन, 3D प्रिंटर, CNC प्रोग्रामिंग, फ्युजन ३६० तसेच संपूर्ण मशीनिंग प्रक्रियेचे आधुनिक ज्ञान देण्यात आले. एशियन पेंट्स, ब्लू स्टार, फिबमोल्ड पॅकेजिंग लिमिटेड आणि जेराई फिटनेस यांसारख्या नामांकित कंपन्यांनी या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभाग घेतला.
मुंबई महानगर प्रदेशाचा वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यातही MUMLची महत्त्वाची भूमिका असून, भारत सरकारच्या दृष्टीकोनानुसार कंपनीने सुमारे २,००० मेगावॅट अतिरिक्त वीज मुंबई महानगर क्षेत्रात उपलब्ध करून देण्यास हातभार लावला आहे.
प्रगती ही सुरक्षित आणि जबाबदार असली पाहिजे, या भूमिकेतून कंपनीने सेफ्टी स्टुअर्डशिप प्रोग्राम सुरू केला आहे. हा उपक्रम कौशल्य विकास कार्यक्रमाचा एक भाग असून, त्यातून युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जात आहेत. त्याचबरोबर कार्यस्थळे आणि स्थानिक समुदायांमध्ये सुरक्षित कामकाजाच्या पद्धतींचा प्रसार करून विकासाच्या प्रक्रियेत कोणत्याही परिस्थितीत मानवी सुरक्षिततेशी तडजोड होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे.
शिक्षण, स्वच्छ ऊर्जा, कौशल्य विकास आणि सुरक्षितता या चार स्तंभांवर लक्ष केंद्रित करत रेसोनिया लिमिटेड समाजासोबत चालत उज्ज्वल, सुरक्षित आणि शाश्वत भवितव्य घडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या उपक्रमांतून स्पष्ट होते.

