जागतिक अवयवदान दिनानिमित्त अपोलोने ६६० हून अधिक अवयव प्रत्यारोपीत रुग्णांना जीवनदान दिले
आपला एक 'हो' आठ लोकांना नवसंजीवनी देऊ शकतो
नवी मुंबई (प्रतिनिधी): अंतःकरण अशांत असतानाही, बुद्धी शांत ठेऊन घेतलेला एक निर्णय अनेकांच्या जीवनात आशा निर्माण करू शकतो. जागतिक अवयवदान दिनानिमित्त, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने (AHNM) अशा दात्यांच्या धैर्याचा, दान प्राप्तकर्त्यांच्या लवचिकतेचा आणि अवयव प्रत्यारोपणामुळे घडून येणाऱ्या, जीवन बदलवून टाकणाऱ्या परिणामाचा सन्मान केला - नव्या जीवनाकडे नेणारा एक असा प्रवास जो विज्ञान, कौशल्य आणि मानवता एकत्र येऊन घडवून आणतात.
प्रत्यारोपणासाठी पश्चिम भारतातील एक अग्रगण्य केंद्र म्हणून, अपोलोने प्रतिष्ठा मिळवली आहे. २०१७ पासून, या रुग्णालयाने ४०८ मूत्रपिंड प्रत्यारोपण, २२९ यकृत प्रत्यारोपण, ११ हृदय प्रत्यारोपण आणि १३ कॉर्निया प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत, यातील प्रत्येक केस जीवन जगण्याची दुसरी संधी दर्शवते, गेल्या दशकात भारताने अवयव प्रत्यारोपणात लक्षणीय प्रगती केली आहे, तरीही मागणी आणि उपलब्धता यांच्यातील वाढती तफावत हे एक गंभीर आव्हान आहे. राष्ट्रीय अवयव आणि ऊतक प्रत्यारोपण संघटनेच्या (NOTTO) च्या माहितीनुसार, दरवर्षी हजारो रुग्ण प्रतीक्षा यादीत असल्याने, यकृत, मूत्रपिंड आणि हृदय प्रत्यारोपणाची मागणी सतत वाढत आहे, अवयवदानाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. परंतु सक्रिय सरकारी कार्यक्रम, रुग्णालयाकडून चालवले जाणारे उपक्रम आणि वाढती जनजागृती यामुळे महाराष्ट्र अवयवदानात आघाडीवर असलेले एक राज्य आहे.
अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई, जागरूकता पसरवण्याच्या आणि कृतीला प्रेरणा देण्याच्या आपल्या दृढ वचनबद्धतेनुसार, 'एक हो आठ जीवनांसाठी' ही प्रतिज्ञा प्रामाणिक समुदाय सहभाग आणि व्यापक प्रचाराच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आहे. मॉल्समध्ये जागरूकता मोहीम आणि मोफत अवयव तपासणी शिबिरे यासारख्या ऑफलाइन उपक्रमांमुळे या विषयावर संवादाला चालना मिळते, ज्यामुळे लोकांना प्रतिज्ञा घेण्यास प्रोत्साहित केले जाते आणि त्यांच्यासाठी ते खूप सोपे देखील ठरते. पाच लाखांहून अधिक नवी मुंबईकरांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना सहभागी करून घेणे, संवादाला प्रोत्साहन देणे आणि अवयव दानाविषयीचे गैरसमज दूर करणे या उद्देशाने ऑनलाइन आणि सोशल मीडिया मोहिमा राबविल्या जातील. ८ ऑगस्ट रोजी, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने रुग्ण समर्थन बैठक आणि सत्कार समारंभ आयोजित करून अवयव दाते, प्राप्तकर्ते, त्यांची कुटुंबे आणि देखभाल करणाऱ्या टीमना एकत्र आणले.
डॉ.अमेय सोनवणे, हेपॅटोलॉजी-लिव्हर ट्रान्सप्लांटचे सीनियर कन्सल्टन्ट, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले,“प्रत्येक प्रत्यारोपण हे केवळ वैद्यकीय कामगिरीपेक्षाही जास्त मानवी नातेसंबंधांची कहाणी आहे. प्रत्येक शस्त्रक्रियेमागे एक कुटुंब असते ज्यांनी त्यांच्या सर्वात कठीण काळात 'हो' म्हटले आणि त्यांचे दुःख दुसऱ्यासाठी जीवनादानामध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा एक 'हो' अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी झुंजणाऱ्या व्यक्तीसाठी जीवनरेखा बनते. रुग्णांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आम्ही पवित्र मानतो आणि अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे, आम्ही त्या विश्वासाचा आदर करतो, काळजीपूर्वक, अचूक शस्त्रक्रिया, प्रगत पोस्ट-ऑपरेटिव्ह देखभाल आणि प्राप्तकर्त्यांप्रती आयुष्यभराची वचनबद्धता. आमची भूमिका ऑपरेशन थिएटरमध्ये संपत नाही - आम्ही याची पुरेपूर काळजी घेतो की प्रत्येक प्राप्तकर्ता पूर्णपणे जगू शकेल, स्वतःच्या कुटुंबांकडे परत जाऊ शकेल आणि आजाराने त्यांच्यापासून हिरावून घेतलेल्या क्षणांना पुन्हा जगू शकेल.”
डॉ.अमित लंगोटे, सिनियर कन्सल्टन्ट, नेफ्रोलॉजी, किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन आणि हायपरटेन्शन स्पेशालिस्ट, अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई म्हणाले,“एक अवयवदाता आठ जणांचे जीव वाचवू शकतो - आणि त्याचा परिणाम त्या आठ जणांच्या कुटुंबांवर, मित्रांवर आणि संपूर्ण समुदायावर होतो. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे केवळ आरोग्याचे अडचणीत येते असे नाही तर उपजीविका आणि भावनिक कल्याणातही व्यत्यय येऊ शकतो. प्रत्यारोपण केवळ अवयवांचे कार्य सुरळीत करत नाही तर, आशा, स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा देखील पुन्हा मिळवून देते. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे, आम्ही एक कार्यक्रम तयार केला आहे जो या प्रत्यारोपण प्रवासाच्या प्रत्येक पैलूची नीट काळजी घेतो- प्रत्यारोपणापूर्वीच्या संपूर्ण निदानापासून ते दीर्घकालीन रिहॅबिलिटेशनपर्यंत प्रत्येक बाबतीत आम्ही हाच मानक शोधतो.”