Skip to main content

कर्करोगाला मात दिलेल्यांसाठी अपोलो चा 'कॅन विन' सदैव सोबत

कर्करोगाला मात दिलेल्यांसाठी अपोलो चा 'कॅन विन' सदैव सोबत...

'कॅन विन' सपोर्ट ग्रुप कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासात सर्वांना एकत्र जोडतो...

नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): राष्ट्रीय कॅन्सर सर्व्हायव्हर्स महिन्याचे औचित्य साधून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, अपोलो कॅन्सर सेंटर (एसीसी) ने 'कॅन विन' सुरु करण्याची घोषणा आज केली. एक कर्करोग समर्थन ग्रुप जो कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासात असलेल्या सर्वांना एकत्र जोडतो. 'सामायिक शक्ती जीवन बदलू शकते' या विश्वासावर आधारित 'कॅन विन' समूह कोणत्याही एका ब्रँडपुरता मर्यादित नाही. या मंचावर ऑन्कोलॉजिस्ट, सायको-ऑन्कोलॉजिस्ट, रुग्ण, कर्करोगातून वाचलेल्या व्यक्ती, रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती आणि स्वयंसेवकांना एकत्र आणले जाते. सहानुभूती, समर्थन आणि सामायिक भावनेतून काम करणारा एक दयाळू समुदाय तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हा फक्त एक समूह नाही तर बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी, शिकण्यासाठी आणि बरे होण्यासाठी एक सुरक्षित जागा आहे. आजाराचे नुकतेच निदान झाले असेल, उपचार घेत असाल किंवा दुसऱ्या कोणाची काळजी घेत असाल किंवा कर्करोगानंतरचे आयुष्य जगत असाल, तर 'कॅन विन' तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही एकटे नाही आहात.

'कॅन विन' हे दोन प्रभावी संकल्पनांचे प्रतिनिधित्व करते: कर्करोगात एक 'कॅन' आहे जे ताकद आणि शक्यतांची आठवण करून देते. 'विन' हे फक्त ध्येय नाही तर एक मानसिकता आहे धैर्य, निर्भीडपणा आणि दृढनिश्चयाने पुढे जाण्याचा निर्णय आहे. या उपक्रमाची सुरुवात एका सत्राने झाली, ज्यामध्ये कर्करोगातून वाचलेल्यांनी त्यांच्या भावनिक कहाण्या सांगितल्या. प्रत्येक कहाणी वैयक्तिक धैर्य, ताकद आणि विजयाने भरलेली होती. या वास्तविक जीवनातील कथा त्याच मार्गावर चालणाऱ्या इतरांसाठी आशेचा किरण बनत आहेत.

आपल्या मुलाची कहाणी सांगताना, पनवेल येथील ११ वर्षांच्या मास्टर जयेशचे वडील म्हणाले,“आमच्या मुलाला हा आजार झाला तेव्हा इतका लहान होता की त्याला कर्करोग समजणे अशक्य होते. त्याची एकमेव इच्छा होती की त्याने त्याची सामान्य काम पुन्हा सुरू करावीत, मित्रांसोबत खेळावे, शाळेत जावे. डॉक्टरांनी आम्हाला खूप मदत केली. आम्ही निराश झालो असलो तरी, आम्ही त्याला कधीही आशा सोडू दिली नाही. आमच्या मुलाला अनेक उपचार घ्यावे लागले, जे कधीकधी खूप आव्हानात्मक होते. त्याचे वय लहान होते, पण लढाई मोठी होती आणि तो जिंकला. आता, त्याला तो कठीण काळ आठवत नाही आणि तो फक्त जगू, हसू इच्छितो आणि मोठा होऊ इच्छितो. त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे सामान्य जीवन जगण्यासाठी आम्ही त्याला शक्य तितका पाठिंबा देण्याचा प्रयत्न करतो.”

पनवेल येथील अवघ्या ६ वर्षांच्या अभिद्याचे वडील म्हणाले,"आमची लहानगी लेक अजूनही कर्करोगाशी खूप धैर्याने लढत आहे. तिला दोनदा कर्करोगाचे निदान झाले आहे परंतु आमच्या डॉक्टरांमुळे आणि इतरांच्या पाठिंब्यामुळे ती आशावादी आहे आणि तिच्या वयाच्या इतर मुलींप्रमाणेच सर्वकाही करू इच्छिते. आमच्या कुटुंबासाठी हा खूप कठीण आणि आव्हानात्मक काळ आहे परंतु आम्ही तिला सर्वोत्तम काळजी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आम्हाला तिच्या भविष्याबद्दल खूप काळजी आहे आणि आशा आहे की लोक आमच्या मुलांना समजूतदारपणे वागवतील ज्यांनी त्यांच्या छोट्या आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे."


अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझ लिमिटेडच्या ग्रुप ऑन्कोलॉजी अँड इंटरनॅशनलचे अध्यक्ष श्री.दिनेश माधवन म्हणाले,“कर्करोगाविरुद्धची लढाई ही केवळ प्रगत उपचारांपुरती मर्यादित नाही तर ती भावनिक लवचिकता आणि मानवी संबंधांबद्दल देखील आहे. 'कॅन विन' सारख्या उपक्रमांमुळे कर्करोगातून वाचलेल्यांना एक व्यासपीठ मिळते जिथे ते त्यांचे विचार शेअर करू शकतात, त्यांच्यासारखे जगणाऱ्या इतरांना पाहू शकतात आणि डॉक्टर, काळजी घेणाऱ्यांच्या साथीने एकत्र बरे होऊ शकतात. हा उपक्रम कर्करोगाविरुद्धच्या लढाईतील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करतो. जर सहानुभूती असेल तर कथाकथन एक उपचारात्मक साधन बनते - वक्ता आणि श्रोता दोघांनाही सक्षम बनवते. काळजीच्या अधिक समग्र मॉडेलकडे वाटचाल करत असताना, आम्ही एक अशी इकोसिस्टिम तयार करण्यासाठी वचनबद्ध आहोत जिथे विज्ञान आणि मानवता हातात हात घालून काम करतात आणि 'कॅन विन' त्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.”

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...