न्यूज अपडेट: १५ जून पर्यंत राज्यात लॉकडाऊन नसून कडक निर्बंध कायम: नवी मुंबई (प्रतिनिधी/दिव्या पाटील) :- राज्यात असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन आणखी १५ दिवसांसाठी वाढवला आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन हा आता १५ जूनपर्यंत असणार आहे. या संदर्भातील माहिती मुख्यमंत्र्यांनी लाईव्हच्या माध्यमातून जनतेला दिली. मे महिन्यात काही ठिकाणी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली तर काही ठिकाणी रुग्णवाढ झाली. त्यानुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. तसेच ज्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे त्या भागातील निर्बंध आणखी कडक करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. कोरोनाबाधित रुग्णांनाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल- ■ महाराष्ट्रातील ज्या क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर १० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या क्षेत्रात खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. ■ सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दु...