न्यूज अपडेट: पत्रकारांचे आज सरकारच्या निषेधार्थ आंदोलन: नवी मुंबई (मुंबई/प्रतिनिधी) :- गेल्या वर्षी टाळेबंदी सुरू झाल्यानंतर आणि आताची टाळेबंदी जाहीर होण्याच्या आधीपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम करणाऱ्या पत्रकार आणि पत्रकारितेतर कर्मचाऱ्यांना लोकलमधून कार्यालयीन कामासाठी फिरण्याची मुभा मिळावी, यासाठी मुंबई मराठी पत्रकार संघासह विविध पत्रकार संघटना राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार करीत आहेत. मात्र राज्य शासन पत्रकारांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहात नाही. पत्रकारांच्या मागण्यांवर चर्चा सुरू असल्याचे सांगून राज्य सरकार वेळ काढू धोरण अवलंबित आहे. शासनाची ही भूमिका निषेधार्ह असून आज मंगळवार दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन परिसरात पत्रकारांचे विविध मागण्यांसाठाचे आंदोलन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून होणार आहे. या आंदोलनात सर्व पत्रकार संघटना आणि पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाने केले आहे. महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दरर...