Skip to main content

न्यूज अपडेट: ऑक्सिजनचा पुरवठ्यासाठी रेल्वे सज्ज; कळंबोली , बोईसर येथून आज वाहतुकीस सुरुवात:

न्यूज अपडेट: ऑक्सिजनचा पुरवठ्यासाठी रेल्वे सज्ज; कळंबोली, बोईसर येथून आज वाहतुकीस सुरुवात:

पनवेल (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे) :- देशातील ऑक्सिजनची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी आता ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेच्या माध्यमातून केला जाणार आहे. महत्त्वाच्या मार्गिकांवर द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू अर्थात लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करण्यासाठी रेल्वे पूर्णपणे सज्ज झाली आहे. रेल्वेच्या माध्यमातून विशेष ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरू केली जाणार असून, त्यातून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक केली जाणार आहे. रेल्वेच्या माध्यमातून आज ही माहिती देण्यात आली आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसला मुंबईजवळील कळंबोली आणि बोईसर रेल्वे स्थानकातून आज सुरुवात होईल आणि ही ऑफ ऑक्सिजन एक्स्प्रेस विजाग जमशेदपूर रौर्केला आणि बोकारो येथे वैद्यकीय द्रवरूप ऑक्सिजन पोहोचतील. 

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरकारने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टॅकर्स रेल्वेने नेता येऊ शकतील का याची चाचपणी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला होता. रेल्वेने लिक्विड मेडिकल ऑक्सिजन वाहतुकीची तातडीने तांत्रिक व्यवहार्यता तपासली. फ्लॅट वॅगन्सवर ठेवलेल्या रोड टॅकरसह रोल ऑन रोल ऑफ अर्थात ' रोरो ' सेवेद्वारे एलएमओची वाहतूक करावी लागेल. काही ठिकाणी पुलांवरील रस्ते आणि ओव्हरहेड इक्विपमेंट्सच्या उंचीच्या निबंधांमुळे विविध आकाराच्या रस्ते टॅकरपैकी रोड टॅकर, फ्लॅट वॅगनवर ठेवता येतील. वाहतुकीच्या मापदंडांची चाचपणी करण्यासाठी, विविध ठिकाणी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. हे रिकामे टॅकर मुंबई व आसपासच्या कळंबोली, बोईसर, रेल्वे स्थानकांमधून हलवले जातील आणि तेथून द्रवरूपी वैद्यकीय ऑक्सिजन टॅकर लोड करण्यासाठी विशाखापट्टणम आणि जमशेदपूर, रुरकेला, बोकारो येथे पाठवले जातील.

विविध ठिकाणी टॅकर हलविण्याच्या दृष्टीने रेल्वेने कळंबोली आणि अन्य ठिकाणी डीबीकेएम वॅगन यापूर्वीच तयार ठेवल्या आहेत. टॅकर हलवण्यासाठी रेल्वे महाराष्ट्राकडून सूचना मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. आज १९ एप्रिल रोजी १० रिकामे टेंकर पाठवण्यासाठी तात्पुरता वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाने संबंधित महाव्यवस्थापकांना पूर्णपणे सज्ज राहण्याचे आणि रेल्वेद्वारे ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी राज्य व केंद्र सरकारच्या संस्थांना सक्रिय सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून करोना रुग्णांसाठी बेड आणि ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.

दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमधील १० हजारपैकी सात हजार बेड करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याची मागणी ही केजरीवाल यांनी केली आहे. देशातील करोना संसर्गाचे प्रमाण गेल्या १२ दिवसांमध्ये ८ टक्क्यांवरून १६.६९ टक्के झाले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले. देशातील लसीकरणाच्या मोहिमेने केवळ ९२ दिवसांमध्ये बारा कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे आणि अशी कामगिरी करणारा एकमेव देश आहे. भारतापाठोपाठ अमेरिकेने बारा कोटी लसीकरण ९७ दिवसांत आणि चीनने एकशे आठ दिवसांत पूर्ण केले आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.













महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...