न्यूज अपडेट : आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थे अंतर्गत गडकिल्ले स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ: पनवेल (रुपाली वाघमारे) :- लहानपणा पासुनच मुलांच्यात छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि गड किल्ल्या विषयी आत्मियता निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेतर्फे दिवाळी निमित्त गडकिल्ले स्पर्धा विभाग व तालुका स्थरावर आयोजीत केल्या जातात . याचेच औचित्य साधून पनवेल नेरे - दूंदरे विभागातील गडकिल्ले बनविलेल्या स्पर्धकांना आज २९ नोव्हेंबर रोजी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करुनेश्वर ओल्डेज केअर हाऊस, भानघर येथे सन्मानित करण्यात आले . किल्ले स्पर्धेतील विजयी झालेले स्पर्धक: प्रथम क्रमांक - केतन ईश्वर ढोरे (करुनेश्वर ओल्डेज केअर हाऊस, भानघर) द्वितीय क्रमांक - यश संदीप माळी (उमरोली) तृतीय क्रमांक - विनोद गंगाराम फडके (विहिघर) यावेळी उपस्तिथ मान्यवरांमध्ये संघटनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. भारत दादा भोपी, पनवेल तालुका अध्यक्ष व युवा व्याख्याते कु. विवेक परशुराम भोपी, नेरे विभाग अध्यक्ष कु. प्रदीप पाटील, वावंजे विभाग अध्यक्ष प्रमेय फडके, विश्वास पाटील शिवनसई, काळुर...