न्यूज अपडेट : पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी व महिला व बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड..!!!
न्यूज अपडेट : पनवेल महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी व महिला व बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड..!!! पनवेेल (प्रतिनिधि/उमेश खांदेकर) :- पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी भाजप नगरसेवक संतोष शेट्टी तर महिला व बालकल्याण सभापतीपदी मोनिका महानवर यांची बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय प्रभाग समिती 'अ' सभापतीपदी अनिता पाटील, प्रभाग समिती 'ब' सभापतीपदी समीर ठाकूर, प्रभाग समिती 'क' सभापतीपदी हेमलता म्हात्रे आणि प्रभाग समिती 'ड' सभापतीपदी सुशील घरत यांची निवड झाली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेत भाजप-आरपीआय ची एक हाती सत्ता असल्याने या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित होता फक्त त्याची औपचारिकता शिल्लक होती. त्यानुसार आज निकाल जाहीर होऊन पुन्हा एकदा स्थायी समिती सभापती, महिला व बाल कल्याण सभापती व प्रभाग समिती सभापतीपदी भाजप आरपीआयचे वर्चस्व स्पष्ट झाले. पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती प्रविण पाटील, महिला व बालकल्याण सभापती कुसूम म्हात्रे, प्रभाग समिती सभापती शत्रृघ्न काकडे, संजय ...