"Health Tips" : दररोज सकाळी १० - १५ मिनिट चालण्याचे फायदे: आरोग्यवर्धक :- आज जाणून घेऊयात दररोज सकाळी १० - १५ मिनिट चालण्याचे फायदे. चालणे हा सहज सोपा सर्वांना सहज होईल असा व्यायाम आहे. कोणत्याही साहित्या शिवाय करता येणारा असा हा व्यायाम आहे. दररोज सकाळी १० -१५ मिनिट चालण्याने शरीर तंदुरुस्त आणि चपळ होण्यास मदत मिळते. सकाळी चालण्याने शुध्द वातावरणातील ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो. हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळच्या कोवळया उन्हातून मिळते. सतत काम करून आलेला थकवा नाहिसा होऊन जातो. दररोज सकाळी चालण्याने चिडचिडे पणा आणि तणाव कमी होण्यास मदत मिळते. नियमित चालण्याने वजन संतुलित राहण्यास मदत मिळते. दररोज चालण्याने शरीरातील अनावश्यक चरबी कमी होण्यास मदत मिळते. नियमित चालण्याने मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढते. नियमित चालण्याने प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते. नियमित चालायची सवय असणाऱ्याना हृदयाविकार होत नाही. नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये ह्रदयविकाराने मृत्यु होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असते. दररोज चालण्याने फुफुस...