न्यूज अपडेट : विकासक विमल शहा समोर या दलालांना पुढे करू नकोस;डॉ. राजन माकणीकर: नवी मुंबई (प्रतिनिधी) :- विकासक विमल शहा समोर ये महादलाल व भडवेगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढे करून स्वतःची पोळी भाजून घेऊ नकोस. अन्यथा वंचित झोपडी धारकांसह तुझ्या घराचा ताबा घेऊ. अशी चेतावणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिली आहे. वेळ आली आहे तुझी व तुझ्या महादलाल तथा मस्तवाल अधिकाऱ्यांना नागडे करण्याची, झोपडीपासून वंचित राहिलेल्यांना सदनिका कश्या मिळत नाहीत हे पाहून घेऊ, कायद्यासमोर तुझ्यासखे छप्पन आडवे झालेत. तू काय चीज आहेस, तुला कायद्याचा व खऱ्या आंबेडकरी वाद्यांचा बडगा दाखवतो. अश्या शब्दात डॉ राजन माकणीकर यांनी एम.आय.डी.सी प्रकल्पात चोरी झाल्याचे सांगून अश्या चोरास नागडे करणार असल्याचे संकल्प व्यक्त केला आहे. शासनाचा प्रकल्पात भडवेगिरी करून महाभ्रष्टाचार करणारे विकासक व एमआयडीसी अधिकारी दोघांची खैर नाही, वीस वर्षांपूर्वी पात्र केलेल्यांना पुन्हा दस्ताऐवजांच्या आधारावर अपात्र करून सदनिका गळपाटण्याचा विकासाकाचा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही धडक मोर्च...