Skip to main content

न्यूज अपडेट : खंडणी आणि किडनॅपिंग मर्ज करून भारतीय जनता पार्टी निर्माण झाली; पालकमंत्री अस्लम शेख :

न्यूज अपडेट : खंडणी आणि किडनॅपिंग मर्ज करून भारतीय जनता पार्टी निर्माण झाली; पालकमंत्री अस्लम शेख :

● आमचे संजय राऊत यांना पुरून उरतात. शरद पवार आणि उद्धव ठाकरे खंबीर आहेत.

● काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपवर सडकून टीका. 

● भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं संविधान भाजप शिस्तबद्ध पद्धतीने संपवत आहे”

● ससून डॉक बंद होत आहे आपण त्याच बंदराचे स्थलांतरण नवी मुंबईत

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- 2021 च्या होणार्‍या आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा रविवारी 17 जानेवारी रोजी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते. या मेळाव्यात भाषण करताना काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपवर सडकून टीका केली. त्याचबरोबर यावेळी त्यांनी नवी मुंबईच्या नागरिकांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं 

“खंडणी आणि किडनॅपिंग मर्ज करून जी पार्टी निर्माण झाली असेल तर ती भारतीय जनता पार्टी असेल. भाजप चांगल्या लोकांच्या मागे ईडी लावत आहे. भाजप शिवसेनासोबत इतके वर्ष होती. ज्यांचा बोट धरून तुम्ही महाराष्टामध्ये आलात त्याच सेनेला हे सपवंत होते. आता शिवसेना चांगलं काम करतंय तर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा काढला”, असा घणाघात त्यांनी केला 

“गेल्या दहा-बारा वर्षात या नवी मुंबईसाठी काहीतरी करायची गरज होती. पण भाजपने निव्वळ खायचं काम केलं. आम्ही आश्वासन देतो, इथल्या भूमीपुत्रांसाठी मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवासाठी आम्ही नक्की निर्णय घेऊ. कॅबिनेट मिटिंगमध्ये नवी मुंबईत बंदर कसे येईल यावर आम्ही लवकरच निर्णय घेऊ”, असं आश्वासन त्यांनी दिलं.

“नवी मुंबईची सध्याची परिस्थिती सर्व बघत आहेत. बदल का हवा? हा प्रश्न नवी मुंबईचा नाही तर देशाचा आहे. आता बदल हवा. धनदांडग्यांना आता घरी बसवायची गरज आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं संविधान भाजप शिस्तबद्ध पद्धतीने संपवत आहे”, अशी टीका त्यांनी केली.

“गॅसचे भाव किती झाले? पेट्रोल-डिझेलचे दर किती वाढले? यावर का बोलत नाही, देश कसा चालेल? आज देश संकटात आहे. मात्र भाजपला त्याचे काही नाही. तुम्ही पक्ष बघू नका फक्त महाविकास आघाडी बघून मतदान करा”, असं आवाहन अस्लम शेख यांनी केलं.

“शशिकांत शिंदे यांनी केलेली विनंती नक्की पूर्ण होणार. नवी मुंबईत बंदर येणार म्हणजे येणार. मुघलांसमोर तलवार ठेवली असती तर इतिहास घडला नसता. व्यापार करणारा व्यपारच करणार. पण या व्यापाऱ्याला आता तुम्ही घरी बसवायची तयारी केली पाहिजे. माझी विनंती की, आता तुम्ही पक्का निर्णय घ्या. महाविकास आघाडीचा झेंडा फडकवा. आम्ही तुमच्याशी तत्पर पण तुम्हीसुद्धा तत्पर राहा, बघा विकास कसा होतो”, असं अस्लम शेख म्हणाले.

मेळाव्यात शशिकांत शिंदे काय म्हणाले?नगरसेवकांची यादी पाहिली तर महाविकास आघाडीचे उमेदवार भक्कम आहेत. लोकांची त्यांना पसंती आहे. निवडणुकीत धनशक्तीचा वापर विरोधक करतील. विरोधक अनेक आरोप करतील, पण आपण जनशक्तीच्या बळावर जिंकून येऊ हा विश्वास ठेवा.

काही वर्षांआधी भाजप केंद्रात सत्तेत आले. मात्र शेतकरी राजाला त्यांनी नाराज केले आहे. भाजपवाले या ना त्या कारणाने सत्ता पडेल, अशी चर्चा घडवून आणत आहेत. पण आमचे संजय राऊत यांना पुरून उरतात. शरद पवार आणि उद्धव ठाकरे खंबीर आहेत.

आता नवी मुंबईची धनशक्ती मोडीत काढायची आहे. बघा 18 तारखेला ग्रामपंचायत निकाल लागेल. बघा या निकालात महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारेल. त्यामुळे आपण नवी मुंबईचा विचार करावा. आपण ही लढाई जिंकू. जे आलेत त्यांचे स्वागत पण जर तिकीट मिळाले नाही म्हणून नाराज होऊ नका. तुम्हाला सोडून देणार नाही. तुमचा विचार नक्कीच आम्ही सर्व करू.

सर्व क्षेत्रातील आणि धर्माचे लोकं महाविकास आघाडीत आहेत. माझा पराभव झाला, पण मला या सर्व नेत्यांनी विधान परिषदेवर पाठवलं. अस्लम शेख साहेब माझी एक मागणी आहे. ससून डॉक बंद होत आहे आपण त्याच बंदराचे स्थलांतरण नवी मुंबईत करावे. इथले स्थानिक भूमिपूत्र महाविकास आघाडीचे उपकार कधीच विसरणार नाही. तुम्ही मिटिंग लावा पोर्ट करण्याचा निर्णय घ्या. मी स्वतः आणि जितेंद्र आव्हाड सोबत आहोत.

एपीएमसी आणि रेल्वे स्टेशनच्या बाहेर पार्किंगची जागा आहे. तिथे पंतप्रधान आवास योजना आणत आहेत? त्याला आमचा विरोध आहे. नवी मुंबईची शोभा घालवू नका. हे भाजप खालच्या पातळीचे आंदोलन करत आहे. रडीचा डाव करतंय, कुणावर खोट आरोप करताय, देशावर राज्य करण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार नाही.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...