कोरोना महासंकट : पनवेल ओरियन मॉल मध्ये कापडाचे दुकान चालू ठेवून पालिकेच्या नियमाचे उल्लंघन : पनवेल ओरियन मॉल मध्ये शुक्रवारी दुकान सुरु करण्यास परवनागी नसताना कापडाचे दुकान चालू ठेवून मनपाने ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल (बातमी किरण पवार) : पालिका आयुक्तांच्या आदेशाने लाॅकडाऊनच्या कालावधीत काही दुकाने विशिष्ट दिवशी उघडण्याची काही अटींवर परवानगी दिली गेली होती. कोरोना विषाणूचा प्रकोप कमी व्हावा यासाठी लाॅकडाऊन देखील वाढविण्यात आलेला आहे. परंतु दैनंदिन जीवनदेखील त्यामुळे प्रभावित होत आहे. यासाठी शासनाने काही बाबतीत सवलती देण्याचा अधिकार त्या त्या स्थानिक प्राधिकाऱ्यांना दिलेला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त हे सक्षम अधिकारी आहेत. त्यानुसार एकल दुकानांना विशिष्ट दिवशी उघडण्यास परवानगी दिली होती. परंतु याकडे दुर्लक्ष करून काही दुकानदार वैयक्तिक फायद्यासाठी कायद्याचा भंग करताना दिसुन आले. पनवेल येथील ओरियन मॉल मध्ये शुक्रवारी दुकान सुरु करण्यास परवनागी नसताना कापडाचे दुकान चालू ठेवून मनपाने ठरवून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केले असल्य...