Skip to main content

कोरोना महासंकट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बिनविरोध निवड; मुख्य निवडणूक अधिकार कार्यालयाने केले जाहीर..!!! 

कोरोना महासंकट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची बिनविरोध निवड; मुख्य निवडणूक अधिकार कार्यालयाने केले जाहीर..!!!



महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची झाली बिनविरोध निवड झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकार कार्यालयाने जाहीर केले आहे. सोमवारी ते सदस्यत्वाची शपथ घेतील.


नवी मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत १३ पैकी ४ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ९ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने जाहीर केली.



विधानसभा सदस्यांद्वारे निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या एकूण ९ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी दाखल १४ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांपैकी एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी आजची अखेरची तारीख होती. १३ उमेदवारांपैकी डॉ. अजित माधवराव गोपछडे (भारतीय जनता पार्टी), संदीप सुरेश लेले (भारतीय जनता पार्टी), किरण जगन्नाथ पावसकर (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), शिवाजीराव यशवंत गर्जे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी) या चार उमेदवारांनी १२ मे रोजी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले.


गोपीचंद कुंडलिक पडळकर (भारतीय जनता पार्टी), प्रवीण प्रभाकरराव दटके (भारतीय जनता पार्टी), रणजितसिंह विजयसिंह मोहिते- पाटील (भारतीय जनता पार्टी), रमेश काशिराम कराड (भारतीय जनता पार्टी), उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), नीलम दिवाकरराव गोऱ्हे (शिवसेना),
शशिकांत जयवंतराव शिंदे (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), अमोल रामकृष्ण मिटकरी (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी). राजेश धोंडीराम राठोड (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांची विधानपरिषदेवर निवड झाली आहे.


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संपत्ती किती आहे आणि काय नाही याविषयी अनेकांना उत्सुकता होती. विधान परिषदेचा अर्ज भरताना आज ते शपथपत्र सादर करतील आणि त्यात खुलासा होईल अशी बहुतेकांना कल्पना होती.



निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपत्तीचा खुलासा केला आहे.


उद्धव ठाकरे यांनी आपला व्यवसाय सर्व्हिस असा दिला. उद्धव ठाकरेंची एकूण जंगम मालमत्ता २४ कोटी १४ लाख इतकी आहे.
कॅश इन हॅंड, बँक डिपॉझिट्स, शेअर्स, बाँड्स, फंड्स - २१ कोटी ६८ लाखविमा पॉलिसी, दागिने हे सर्व मिळून त्यांची मालमत्ता २४ कोटी १४ लाख आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावावर वाहन नाही.


उद्धव ठाकरे यांच्या नावावर वाहन नाही.
उद्धव यांची स्थावर मालमत्ता ५२ कोटी ५४ लाख आहे.
उद्धव यांनी १९८६ ते १९८८ दरम्यान रायगड जिल्ह्यात ५ प्लॉट्स घेतले होते त्याची किंमत ९५,००० आहे.


तसेच एका जागेवर त्यांचं फॉर्महाऊस आहे त्याची किंमत ५ कोटी रुपये आहे.


अहमदनगर आणि माहीममध्ये प्लॉट्स त्यांची एकूण किंमत - ४ कोटी २० लाख इतकी आहे. त्यावर बांधकामानंतर त्या जागेची किंमत - १३ कोटी ६४ लाख इतकी आहे.


त्यांच्या बांद्रा इस्ट आणि बांद्रा वेस्ट या रहिवासी जागांची एकूण किंमत ३३ कोटी ७३ लाख इतकी आहे. उद्धव यांच्या नावावर असलेली स्थावर मालमत्ता ५२ कोटी ४४ लाख आहे. उद्धव ठाकरे यांच्या नावावर एचडीएफसी बॅंकेचं ४ कोटी रुपयाचं कर्ज आहे.


उद्धव यांची पत्नी रश्मी ठाकरे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता ६५ कोटींची आहे. रश्मी ठाकरे यांच्या उत्पन्नाचं साधन बिझनेस आहे. उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे स्रोत वेतन, डिव्हिडंड फंड आणि कॅपिटल गेन हे आहेत.


उद्धव ठाकरेंविरुद्ध २३ केसेस पेंडिंग आहेत, पण दोषी एकातही नाही.



आदित्य ठाकरे यांची संपत्ती किती?
विधानसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे यांनी शपथपत्र सादर केलं होतं. त्यात त्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता १६ कोटी रुपये इतकी आहे असं सांगितलं होतं.


आदित्य ठाकरे यांच्याकडे १३ हजार ३४४ रुपये रोख रक्कम आहे. आदित्य ठाकरेंच्या बँकांमधील वेगवेगळ्या ठेवींची किंमत १० कोटी ३६ लाख इतकी आहे.


आदित्य ठाकरेंकडे जवळपास ६४ लाख रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू आहेत. आदित्य ठाकरेंच्या मालकीची १ BMW कारही आहे. या गाडीची बाजारभावानं किंमत ६,५०,००० लाख रुपये आहे.


 


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...