कोरोना महासंकट : मुख्या प्राण्यांनवरही उपासमारी; पण बेलापुर येथील शर्मा कुटुंबानी दिला मदतीचा हात: पण अनेक समाजसेवी व भावनात्मक माणसं मुख्या प्राण्यांना जवळ करतायत तर काही आसरा देखील देतायत. नवी मुंबई : कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ९०० हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. अनेक जण आता भीतीच्या सावटाखाली जगत आहेत, कोरोना विषाणूचा फटका आता प्राण्यांनाही बसू लागला आहे. भारतामध्ये बेरेच कुत्री, मांजरी रस्त्यावर सोडून दिले आहेत आणि काहीतर जन्मता रस्त्यावरच राहत आहेत. आजची उद्योग नगरी वेब न्यूज़ ला माहिती मिळाली की नवी मुंबई बेलापुर शहरातील सेक्टर ८ मधील अशाच एका स्वयंसेवी जोडप्यांनी श्री. संदीप शर्मा व सौ. नीता शर्मा यांनी मुख्या प्राण्यांना दिला मदतीचा हात. तसेच या दोघांनी संगितले की, लॉकडाउन झाल्यापासून आणि त्याआधीही पासुनच "आम्ही अनेक भटक्या व सोडलेल्या कुत्र्यांची दररोज अन्न देत आहोत, यातले काही कुत्रे लोकांनी सोडून दिलेले पण असतिल." बेलापुर येथील व त्यांच्या अपार्टमेंटमध्ये तसेच बेलापुर सेक्टर - १,२, ८, या भागातील ७० कुत्र्यांना दररोज ते कुटुंब २० किलो चिकन वाफवून त्या मुख्या प्राण...