मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात
मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.