Skip to main content

सामाजिक कार्यातून स्व. जनार्दन भगत यांचे निरंतर स्मरण...भगतसाहेबांमुळे समाजकार्याला महत्व - लोकनेते रामशेठ ठाकूर

सामाजिक कार्यातून स्व. जनार्दन भगत यांचे निरंतर स्मरण...भगतसाहेबांमुळे समाजकार्याला महत्व - लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल (हरेश साठे): राजकारणापेक्षा समाजकारण महत्वाचे असते आणि हि समाजहिताची शिकवण स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी दिली, त्यामुळेच समाजकार्याला महत्व मिळाले, असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी (दि. ०७ मे ) उलवा नोड येथे केले.

कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव तसेच पनवेल तालुकास्तरीय "स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२५" पारितोषिक वितरण समारंभ उलवे नोड मधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे समारंभपूर्वक व मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी समारंभ अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते. स्वर्गीय जनार्दन भगत साहेबांनी अहोरात्र आपला देह 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' या तत्त्वाच्या पूर्ततेसाठी कारणी लावला. तळागाळातल्या लोकांबदल त्यांना विशेष प्रेम होते. दारिद्रय व भूक यांच्याबद्दल अगदी मनापासून तळमळ होती. तळागाळातील समाजाचा उद्धार फक्त शिक्षणामूळेच होऊ शकते हे त्यांनी जाणले होते. आपली दूरदृष्टी, अविश्रांत श्रम, चिकाटी, धडाडी त्याचबरोबर व्यापक समाजहिताची तळमळ ही उदात्त भावना स्व. जनार्दन भगत साहेब यांच्या अंतःकरणात कायम होती. जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले असून त्यांनी अहोरात्र लोकांची सेवा केली. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवत फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी विभागातील भांडणतंटे दूर करण्याच्या दृष्टिकोनातून देवदूताची भूमिका सुद्धा पार पाडत समाजाला न्याय दिला.भगतसाहेबांनी कुटुंबाला नाही पण समाजाच्या हितासाठी आपले आयुष्य खर्च केले. त्यांच्या मुशीतून राजकीय, सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते घडविले. त्याचबरोबर बेळगाव सीमा प्रश्नावर त्यांनी एक वर्ष कारावास सोसला आहे. भगतसाहेबांचे कार्य अफाट राहिले आहे, त्यामुळे त्यांचा त्याग आणि त्यांची स्मृती कायम स्मरणात रहावे, यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भगतसाहेबांची जयंती आणि पुण्यतिथी सामाजिक उपक्रमात साजरी केली जाते. त्या अनुषंगाने यंदाही पुण्यतिथीचा कार्यक्रम समाजोपयोगी उपक्रमाने पार पडला. यावेळी ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल तालुकास्तरीय "स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२५" मधील विजेत्या ग्रामपंचायतींचा तसेच गुणिजनांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी 'देवकी मीडिया' प्रस्तुत व 'कलारंजना मुंबई' निर्मित, उदय साटम संकल्पित आणि दिग्दर्शित "मराठी पाऊल पडते पुढे" हा १०१ कलावंताचा संच असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा ४६०० वा प्रयोग सादर झाला.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुढे बोलताना सांगितले कि, लोकनेते दि. बा. पाटील यांनी भगतसाहेबांना आणि त्यांनी आम्हा सर्वांना घडवले. भगतसाहेबांची शिकवणी मोठी होती आणि ती आम्ही अंगिकारली. ग्रामस्वच्छता, शिक्षण आणि न्यायावर त्यांनी भर दिला. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, आंबेडकर, फुले यांच्या विचाराचा पगडा त्यांच्यावर होता. त्याचबरोबर संघटन त्यांचा आत्मा होता. अनिष्ठ प्रथांना त्यांचा कायम विरोध राहिला आहे. त्याच धर्तीवर वायफळ खर्च करण्यापेक्षा सामाजिक कार्य, गरजवंतांना मदत करणे हा गुण चांगला आहे, त्या अनुषंगाने सर्वानी कार्यरत रहावे, असे आवाहनही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. आपला देश आणि महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढे चालला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी, भगतसाहेबांचा शिक्षण आणि स्वच्छता जिव्हाळ्याचा विषय होता त्यामुळे त्यांनी प्रकर्षाने त्यामध्ये स्वतःला झोकून काम केले असल्याचे सांगितले. स्वच्छता विषयक जागृती वाढत चालली आहे. त्याला वेग आणण्यासाठी सिडको हद्दीतील गावांनी घनकचरा वर्गीकरण आणि निर्मूलन प्रकल्पासाठी आग्रह धरला पाहिजे असे त्यांनी सांगत पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायत आणि गुणिजनांचंही कौतुक करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. 

यावेळी प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, भगतसाहेब थोर माणूस. ते आम्हा सर्वांचे गुरु होते. त्यांची दरवर्षी पुण्यतिथी साजरी होत असताना फेब्रुवारी लीपमुळे दरवर्षी चार वर्षांनी जयंती असते ती सुद्धा मोठ्या सामाजिक कार्यात उत्साहात साजरी केली जात आहे. भगतसाहेब कमी शिकले असले तरी त्यांना शिक्षणाची खूप आवड होती. त्यांच्या नावाने असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेने मोठे यश मिळवले आहे. भगतसाहेब न्यायदानाचे काम करायचे आणि याच संस्थेतून दोन न्यायाधिश तयार झाले. संस्थेचे यशाचे सर्वश्रेय रामशेठ ठाकूर यांना जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रमुख पाहुणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी म्हंटले कि, भगत साहेबांनी सामाजिक कामांचा पाया रचला तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कळस बांधला, जावई कसा असावा तर रामशेठ ठाकूर यांच्यासारखा, कारण त्यांनी शेलघर या त्यांची सासुरवाडी असलेल्या गावात होणाऱ्या साई मंदिराला अडीच कोटी रुपयांची देणगी दिली. त्यांनी जगभर नाव निर्माण करणारी भगतसाहेबांच्या नावाने शिक्षण संस्था उभी केली. भगत साहेबांनी माणसे पेरली, गव्हाण परिसराच्या विकासात रामशेठ ठाकूर यांचा मोलाचा वाटा आहे. मै जहाँ खडा रहता हूँ, लाईन वहासे शुरू होती है, हे रामशेठ ठाकूर यांनी दाखवून दिले. त्यांनी जिथे हात लावला तिथे सोने झाले, जावई कसा असावा तर रामशेठ यांच्यारखा हे त्यांनी दाखवून दिले. दिबांना सिडकोचे अधिकारी घाबरत असत, आता लोकनेते रामशेठ ठाकूर यांना घाबरतात, याचा अनुभव मला आहे. दिबांनंतर एकच नेता म्हणजेच लोकनेते रामशेठ ठाकूर आहेत. रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेला देणगी देणारे मोठे देणगीदार आहेत, त्यांचे कार्य खूप मोठे असून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी माणसे टिकवली त्यांना पुढे आणले त्याचबरोबरीने भगतसाहेबांचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचे काम केले, असेही महेंद्र घरत यांनी अधोरेखित केले. तसेच भगतसाहेब मितभाषी आणि सर्वाचा विचार करणारे होते, तो गुण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

या समारंभाचे प्रास्ताविक जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले. त्यांनी भगतसाहेबांच्या कार्याला व आठवणींना उजाळा दिला.

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी, भगतसाहेबांच्या कन्या व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, दिबासाहेबांचे सुपुत्र अतुल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, , जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाइस चेअरमन वाय. टी. देशमुख, पांडुशेठ घरत, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या कार्यकारी मंडळ सदस्या वर्षा ठाकूर, अनिल भगत, संजय भगत, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, पनवेल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते, कर्जत गटशिक्षण अधिकारी नवनाथ साबळे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊशेठ पाटील, रत्नप्रभा घरत, वसंतशेठ पाटील, भाजपचे नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, उलवे मंडल अध्यक्ष रुपेश धुमाळ, शिवकर सरपंच आनंद ढवळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, माजी नगरसेवक अजय बहिरा, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, विजय घरत, जितेंद्र म्हात्रे, जयवंत देशमुख, चिंतामणी घरत, कमलाकर देशमुख, भार्गव ठाकूर, सुधीर ठाकूर, विश्वनाथ कोळी, अनंता ठाकूर, निलेश खारकर, वामन म्हात्रे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन सुप्रसिध्द निवेदिका समीरा गुजर तसेच आकाश पाटील, सागर रंधवे यांनी तर आभार प्रदर्शन वाय. टी. देशमुख यांनी केले.

सन्मान पात्र-

"स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्कार स्पर्धा २०२५" पारितोषिक 

प्रथम क्रमांक- चिंध्रण ग्रामपंचायत- ०१ लाख रुपये व सन्मानचिन्ह

द्वितीय क्रमांक - विचुंबे ग्रामपंचायत ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह

तृतीय क्रमांक- गव्हाण ग्रामपंचायत २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह 

उत्तेजनार्थ - करंजाडे आणि तुराडे ग्रामपंचायत - प्रत्येकी ११ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह

शिक्षण, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींचा गुणगौरव

१) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष - पुरस्कार स्वरुप - ०१ लाख रुपये.

२) चांगू काना ठाकूर इंग्रजी माध्यम (प्राथमिक विभाग) विद्यालय - पीएलसी स्वच्छता मॉनिटर मोहिम २०२४-२५ राज्यस्तरीय फेरी २ मध्ये दुसरा क्रमांक.

३) श्रावणी थळे, चांगू काना ठाकूर इंग्रजी माध्यम (माध्यमिक विभाग) विद्यालय - एसएससी परिक्षा मार्च २०२४ मध्ये ९८ टक्के गुणांसह रायगड जिल्हयात द्वितीय क्रमांक.

४) स्वस्तिक भोसले, चांगू काना ठाकूर इंग्रजी माध्यम (माध्यमिक विभाग) विद्यालय - युनिफाईट स्पर्धेत राज्यस्तरावर सुवर्णपदक आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड.

५) रिया मौर्य, चांगू काना ठाकूर विद्यालय, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय(कनिष्ठ विद्यालय नवीन पनवेल - महाराष्ट्र राज्य 'अस्मिता खेलो इंडिया २०२५' वुशू स्पर्धेत रौप्यपदक.

६) श्रीमती भागुबाई चांगू काना ठाकूर विद्यालय, द्रोणागिरी - पीएलसी स्वच्छता मॉनिटर मोहिम २०२४-२०२५ फेरी १ महाराष्ट्रात तृतीय क्रमांक, दुसऱ्या फेरीत आठवा क्रमांक.

७) दीप संजय दांगडे, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय आणि तुकाराम नारायण घरत कनिष्ठ महाविद्यालय गव्हाण कोपर - विभागीय स्तर कुस्ती स्पर्धेकरिता निवड.

८) रिषीत गुप्ता, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल खारघर - जेईई (मुख्य )२०२५ परिक्षेत ९९ टक्के.

९) रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय खारघर - जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकून रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक,- रोख पारितोषिक एक लाख रुपये.

१०)शिवसुंदर रमेश साहो, रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविदयालय, खारघर - कुस्ती, वुशू आणि ज्युडो या क्रीडा प्रकारात राज्य आणि विद्यापीठ स्तरावरील स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरी

११) ऍड. ऋषिकेश पाटील, भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय - गौरवशाली माजी विद्यार्थी - महाराष्ट्र न्यायिक सेवामध्ये ५२ वा क्रमांक पटकावून न्यायाधिश म्हणून निवड.

१२) आरव सिंग, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल उलवे- मेंटल मॅथ्स स्पर्धा २०२४-२५ साठी राष्ट्रीय स्तरावर पात्र.

१३) धैर्य किशोर पाटील - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अंडर १४ संघात वेस्ट झोन स्पर्धेसाठी निवड आणि अंडर १४ वेस्ट झोन लीग २०२४-२५ चे विजेतेपद.

१४) रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालय, खारघर ओवेपेठ - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत रायगड जिल्ह्यातून सर्वाधिक पदके मिळवत प्रथम क्रमांक,- पारितोषिक एक लाख रुपये. 

१५) श्वेता भार्गव ठाकूर, माजी विद्यार्थी - चांगू काना ठाकूर विद्यालय नवीन पनवेल - नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ कंस्ट्रक्शन मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरमधून पोस्ट ग्रॅज्युएट इन क्वॉलिटी सर्व्हिस अँड कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेन्ट पदवी.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...