‘डॉ. राजेश पाटील’ यांची भाजपाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती नवी मुंबई (प्रतिनिधी): नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी प्रख्यात शिक्षणतज्ञ ‘डॉ. राजेश पाटील’ यांची नियुक्ती झाली असून उच्चशिक्षित आणि अनुभवी व्यक्तीची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये व सर्वस्तरावर उत्साहाचे वातावरण झाले आहे. तसेच, डॉक्टर राजेश पाटील यांनी आपल्या राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे नवी मुंबईत विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे. जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. पाटील यांनी पक्षाच्या विचारधारेला बळकटी देण्यासाठी आणि नवी मुंबईतील जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तर, डॉ. राजेश पाटील यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या नियुक्तीमुळे नवी मुंबईतील भाजपच्या राजकीय गतिशीलतेला नवा आयाम मिळेल, अशी अप...