Skip to main content

महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन- कामगारांच्या हक्काच्या लढ्यासाठी देशातील सर्व केंद्रीय संघटनांनी एकत्रतीत याव्यात

महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन- कामगारांच्या हक्काच्या लढ्यासाठी देशातील सर्व केंद्रीय संघटनांनी एकत्रतीत याव्यात....

मुंबई (प्रतिनिधि): न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटना (NMKG) गेल्या २० वर्षांपासून कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहे. जागतिक पातळीवरील शिपिंग कंपनी मर्क्स, डी. पी. वर्ल्ड, पीएसए सिंगापूर, अदानी ग्रुप येथील कामगारांना संघटित करून सेवा-शर्तींच्या अधिन राहून चांगले वेतनवाढीचे करार केलेले आहेत. भारतातील आयटीएफ सलग्न सर्व संघटनांनी एकत्र येऊन आपापल्या क्षेत्रात कामगारांना संघटित करावे त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास, आयटीएफची पूर्ण ताकद कामगारांच्या मागे लावण्यास मी आयटीएफ या बहुराष्ट्रीय संघाचा एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर म्हणूनआपणांस आश्वासित करत आहे असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले. मुंबई येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हाॅटेलमध्ये झालेल्या इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF) संघटनेच्या संलग्न संघटनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आयटीएफचे जनरल सेक्रेटरी स्टिफन काॅटन, एनयूएसआयचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदाळगावकर,एमयूआयचे कॅप्टन प्रधान तसेच भारतातील आय टी एफ संलग्न संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पुढील पाच वर्षांसाठी कामाची रूपरेषा ठरविण्यासाठी चर्चा झाली. या बैठकीला स्टिफन काॅटन यांनी विशेष मार्गदर्शन केले.

मरोक्कोमध्ये झालेल्या २०२४ च्या जागतिक अधिवेशनात भारतातून पहिल्यांदाच महेंद्रशेठ घरत हे आयटीएफचे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर म्हणून निवडून आल्याबद्दल आयटीएफचे जनरल सेक्रेटरी स्टिफन काॅटन यांनी अभिनंदन केले. त्यांच्या कामाचे, निर्भीड वक्तृत्वाचे कौतुक करून महेंद्रशेठ घरत यांना पुढील वाटचालीसाठी स्टिफन यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी स्टिफन काॅटन यांचा पुणेरी टोपी आणि भव्य पुष्पहार देऊन महेंद्रशेठ घरत यांनी सत्कार केला. त्यावेळी भारतात झालेल्या या सत्काराबद्दल काॅटन यांच्या चेहऱ्यावर अत्यानंद दिसत होता. सर्वंच क्षेत्रांत खासगीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. एआय तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात कामगारांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. मात्र जागतिक उद्योजक भारताकडे आकर्षित होत आहेत, भारत महान वैश्विक शक्ती होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. अशावेळी कामगार मूलभूत अधिकारांपासून वंचित राहाता कामा नयेत, सरकारला कामगारांसंबधात सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू, केंद्रीय 12 संघटना एकत्र येऊन रननिती आखावी असेही महेंद्रशेठ घरत म्हणाले. न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष पी. के. रामण म्हणाले, जागतिक पातळीवरील मर्क्स ही कंपनी अनेक देशांत ट्रान्सपोर्ट कामगारांचे शोषण केले जाते, त्याविरुद्ध आवाज उठवला. त्यांच्या मागे आयटीएफने अभियान उभे करायला हवे, असा ठराव आयटीएफच्या २०२४ मध्ये मोरोक्कोमध्ये झालेल्या जागतिक अधिवेशनात करून पास केला आहे, परंतु ॲक्शन घेऊन अंमलबजावणी झालेली नाही त्याचा खुलासा करावा असा प्रश्न उपस्थित केला. आयटीएफचे दिल्ली येथे क्षेत्रिय कार्यालय आहेएशिया पॅसीफिक रिजनल सेक्रेटरी ची जागा रिकामी आहे ती तातडीने भरावी जेणेकरून आयटीएफच्या कामाला गती येईल आणि ते अधिक जोमाने होईल, अशीही मागणी पी. के. रामण यांनी या बैठकीत केली.

या बैठकीचे आयोजन नॅशनल युनियन ऑफ सी-फेररर्स ऑफ इंडिया, मॅरिटाईम युनियन ऑफ इंडियाने (MUI) यांनी केले होते.

या बैठकीला न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, उपाध्यक्ष किरीट पाटील, लंकेश ठाकूर, आनंद ठाकूर, अरुण म्हात्रे,तसेच इतर संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...