महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन- कामगारांच्या हक्काच्या लढ्यासाठी देशातील सर्व केंद्रीय संघटनांनी एकत्रतीत याव्यात
महेंद्रशेठ घरत यांचे आवाहन- कामगारांच्या हक्काच्या लढ्यासाठी देशातील सर्व केंद्रीय संघटनांनी एकत्रतीत याव्यात.... मुंबई (प्रतिनिधि): न्यू मॅरिटाईम ॲण्ड जनरल कामगार संघटना (NMKG) गेल्या २० वर्षांपासून कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहे. जागतिक पातळीवरील शिपिंग कंपनी मर्क्स, डी. पी. वर्ल्ड, पीएसए सिंगापूर, अदानी ग्रुप येथील कामगारांना संघटित करून सेवा-शर्तींच्या अधिन राहून चांगले वेतनवाढीचे करार केलेले आहेत. भारतातील आयटीएफ सलग्न सर्व संघटनांनी एकत्र येऊन आपापल्या क्षेत्रात कामगारांना संघटित करावे त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यास, आयटीएफची पूर्ण ताकद कामगारांच्या मागे लावण्यास मी आयटीएफ या बहुराष्ट्रीय संघाचा एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर म्हणूनआपणांस आश्वासित करत आहे असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत म्हणाले. मुंबई येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हाॅटेलमध्ये झालेल्या इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन (ITF) संघटनेच्या संलग्न संघटनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आयटीएफचे जनरल सेक्रेटरी स्टिफन काॅटन, एनयूएसआयचे जनरल सेक्रेटरी मिलिंद कांदाळगावकर,एमयूआयचे कॅप्टन प्रध...