मुंबई ऊर्जा मार्ग लि. जपत आहेत सामाजिक बांधिलकी, सी एस आर फंडातून साकारले लोकाभिमुख उपक्रम
ठाणे (प्रतिनिधी):- भारताच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने हाती घेतलेल्या ऊर्जा सक्षमीकरणाच्या अभियानात महत्त्वाची भूमिका बजावणारे मुंबई ऊर्जा मार्ग ली. व्यवस्थापन विविध लोकाभिमुख उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. त्यांच्या माध्यमातून नुकतेच अंबरनाथ तालुक्यातील कासगाव जिल्हा परिषद शाळेला महिलांसाठी शौचालय बांधून देण्यात येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात अतिरिक्त वीजपुरवठा मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग ली. अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत असल्यामुळे या आस्थापनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तासगाव जिल्हा परिषद शाळेत 170 विद्यार्थी शिकत असून त्यापैकी 83 विद्यार्थिनी आहेत. या शाळेत महिलांसाठी वेगळे शौचालय नव्हते. मुली तसेच महिला शिक्षक वृंद यांच्यासाठी अत्यंत गैरसोय होत होती. शाळा व्यवस्थापन समितीने मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्याकडे महिलांसाठीचे वेगळे शौचालय बांधून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला. मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड कंपनीच्या वतीने विना विलंब या प्रस्तावास अनुमती दिली गेली. सध्या काम प्रगतीपथावर असून लवकरच या शाळेमध्ये आद्ययावत सुविधांनी सज्ज असे महिला सौचालय कार्यान्वित होणार आहे.
मुंबई ऊर्जा मार्ग ली. त्यांच्या माध्यमातून अंबरनाथ,कल्याण आणि भिवंडी तालुक्यात अनेक लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या गावातील होतकरू तरुणांना विना मोबदला इलेक्ट्रिशियनसचे कोर्स शिकवून त्यांना रोजगारक्षम बनविण्यात या कंपनीचे मोलाचे योगदान आहे. तसेच किमान डझनभर गावांमध्ये बोरवेल खणून देऊन पाण्याचे दर्भिक्ष या कंपनीने संपविलेले आहे. या व्यतिरिक्त जिथे लोकाभिमुख गरज उत्पन्न झाली असेल तिथे त्या स्वरूपाचे काम करून मुंबई ऊर्जा मार्ग ली. यांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे.