Skip to main content

आचार्य मनीष यांच्याद्वारे HIIMS येथे डॉ. बीआरसी यांच्या 'हेल्प' पुस्तकाचे प्रकाशन:

आचार्य मनीष यांच्याद्वारे HIIMS येथे डॉ. बीआरसी यांच्या 'हेल्प' पुस्तकाचे प्रकाशन:

नवी मुंबईतील हिम्स (HIIMS) मध्ये मूत्रपिंड व यकृत निकामी कर्करोग आणि हृदयाच्या समस्यांवर आयुर्वेद तसेच नैसर्गिक उपचार पध्दतींद्वारे होणार यशस्वी उपचार उपलब्घ: आचार्य मनीष

नवी मुंबई (प्रतिनिधी): किडनी, यकृत निकामी होणे, त्याप्रमाणे कर्करोग आणि हृदयाच्या समस्यावर आयुर्वेद आणि नैसर्गिक पध्दतींनी यशस्वी उपचार शक्य असल्याचे प्रतिपादन येथील आचार्य मनीष आणि डॉ. बिस्वरूप रॉय चौधरी (बीआरसी) यांनी HIIMS नवी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी डॉ. बीआरसी यांच्या नवीन ‘लेट युअर सेकंड हार्ट हेल्प’ द्वारे ‘टेलरिंग इज द हेल्दी प्रोफेशन’ या महत्त्वपूर्ण अभ्यासाचे प्रकाशन केले आहे. या अभ्यासात एक आश्चर्यकारक निरीक्षण समोर आले आहे की टेलर ही अशी व्यक्ती की जिते ज्याचे कामच मुळात बैठे असून देखील आपल्यातील सर्वात निरोगी गट म्हणून तो ओळखला जातो. एक निरोगी व्यवसाय म्हणून टेलरिंगचे महत्त्व अधोरेखित करून, व्यवसाय आणि आरोग्य यांच्यातील परस्परसंबंध समजून घेण्यासाठी हा अभ्यास महत्त्वपुर्ण ठरत आहे.

डॉ बीआरसी (HIIMS चे सह-संस्थापक) सांगतात की, एखादी व्यक्ती ‘लेट युअर सेकंड हार्ट हेल्प’  हे पुस्तक वाचून इतरांना मदत करणे सुरू करू शकते किंवा दोन महिन्यांच्या ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे हेल्प प्रॅक्टिशनर सारखा व्यावसायिक मार्ग स्वीकारू शकते, ज्यामध्ये ७ दिवसांच्या प्रशिक्षणाचा समावेश आहे. दयानंद आयुर्वेदिक महाविद्यालय, जालंधर येथे या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल. शिलाई मशिन चालवताना टेलरद्वारे चालवलेल्या लेग-पेडल हालचालीमुळे पोटरीचे स्नायू सक्रिय होतात. ज्याला आपले दुसरे हृदय म्हणतात. कोणत्याही रोगाचे मूळ कारण शोधणे आणि कोणत्याही गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी विज्ञानाचा वापर करणे हेच आमचे ध्येय आहे असेही डॉ बीआरसी यांनी स्पषस्ष्ट केले.

डॉ. बीआरसी यांना त्यांच्या गुरुत्वाकर्षण आणि ग्रॅड (GRAD) प्रणाली आणि उष्णतेवर आधारित आविष्कारासाठी प्रतिष्ठित असा ‘इनोव्हेशन अवॉर्ड २०२४’ मिळाला आहे. वर्ल्ड असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मीडियम एंटरप्रायझेस (WASME) आणि इथिओपिया दूतावास यांनी संयुक्तपणे नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या आफ्रिकन देशांसाठी आंतरराष्ट्रीय राजदूत संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला २५ आफ्रिकन राष्ट्रांचे राजदूत उपस्थित होते.

आचार्य मनीष  हे हिम्स (HIIMS) आयुर्वेदाचे संस्थापक असून ते विविवध माध्यमातून आयुर्वेदाचा प्रसार करत आहेत. या निमित्ताने आयोजित परिषदेत ते म्हणाले की, जीवनशैलीतील बदल आणि जुन्या उपचार पद्धतींद्वारे जीवघेण्या आजारांवर उपचार करणे शक्य आहे. यासोबतच आयुर्वेद आणि नैसर्गिक उपचाराची परिणामकारकता सुचवणारे परिणाम आणि पुरावेही सादर करण्यात आले. हिम्स (HIIMS)  मध्ये शरीराची अंतर्गत शक्ती वाढवून किडनी, कर्करोग, यकृत, साखर, बीपी आणि हृदयविकार सारख्या गंभीर आजारांवरही मात केली जाते.

आचार्य मनीष सांगतात की, विविध रुग्णालयांमध्ये बराच वेळ आणि पैसा खर्च करून विविध डायलिसिस रुग्ण हिम्स (HIIMS) मध्ये येतात. आमची टीम आवश्यक उपचार देण्यासाठी सदैव तत्पर आहे आणि अशा प्रकारे, आम्ही किडनी, यकृत निकामी होणे, कर्करोग, हृदयविकार आणि थॅलेसेमिया ग्रस्त अनेक गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. हिम्स (HIIMS)  मध्ये जीवघेण्या आजारांनी ग्रस्त रुग्ण काही महिन्यांतच पूर्णपणे बरे झाले आहेत.

डॉ. बीआरसी हे डिआयपी आहार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोषणाच्या गणितीय मॉडेलचे निर्माते आहेत, जे भारत (आयुष मंत्रालय), नेपाळ (राष्ट्रीय आरोग्य मंत्रालय, आणि मलेशिया (लिंकन विद्यापीठ) नेपाळमधील क्लिनिकल चाचण्यांद्वारे मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हाडांचे रोग आणि गंभीर किडनी रोगांवर प्रभावी सिद्ध झाले आहे. त्यांनी रुग्णांचे डायलिसिसवरील अवलंबित्व दूर करण्यासाठी त्यांनी गुरुत्वाकर्षणावर आधारित GRAD प्रणालीचा शोध लावला. एक अभियांत्रिकी पदवीधर, हे एक मधुमेह आणि दीर्घकालीन किडनी रोग या विषयात पदव्युत्तर पदवीधर आणि पीएचडी आहेत.

हिम्स (HIIMS)  मध्ये, रुग्णांना योग्य उपचार आणि बरे होण्यासाठी बाजरी आणि औषधी वनस्पतींनी बनवलेले अन्न दिले जाते. हिम्स (HIIMS)  पोस्ट्चरल थेरपी देखील वापरते ज्यामुळे 70% डायलिसिस टाळता येते. पोस्ट्चरल थेरपीने, १००% उच्च रक्तदाबाचे रुग्ण कोणत्याही औषधाशिवाय त्यांचे रक्तदाब ताबडतोब नियंत्रित करू शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की हिम्स (HIIMS) मध्ये, रुग्णांना SBI कॅशलेस आरोग्य संजीवनी पॉलिसीद्वारे मोफत उपचार देखील मिळू शकतात. आज देशभरात 100 हून अधिक शुद्धी क्लिनिक रुग्णांवर उपचार करत आहेत. मुंबई, ठाणे, गोवा, मेरठ, चंदीगड, लुधियाना, अमृतसर, जालंधर, संगरूर, गुरुग्राम, लखनौ आणि भागलपूरसह भारतातील अनेक शहरांमध्ये हिम्स (HIIMS)  ची केंद्र कार्यरत आहेत. देशभरात २५० हून अधिक डॉक्टर सेवा पुरवतात. 

अधिक माहितीसाठी www.biswaroop.com/help 

वर लॉग इन करा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...