Skip to main content

कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन

कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या विधी महाविद्यालयाचे उद्घाटन:

"शिवसेनेचा जन्मच हा न्याय हक्काच्या लढ्यासाठी झाला "- मा उद्धव ठाकरे

पनवेल (प्रतिनिधी): शिवसेनेचा जन्मच मुळी न्याय हक्काच्या लढाईसाठी झाला आहे. हा लढा लढत असताना अनेेक वेळा शिवसैैनिकांवर केसेस होतात. परंतु आता आपल्याला त्याची भिती नाही, कारण कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या विधी महाविद्यालयातून शेकडो तरुण आता दरवर्षी वकील म्हणून बाहेर पडतील व ते शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहतील, असा विश्‍वास आज तळोजा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, गेली 27 वर्ष बबन पाटील हे या विद्यालयातील विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. त्याचप्रमाणे त्यांना मोफत गणवेश, वह्या पुस्तके, पोषण आहार दिला जात आहे. हे काम त्यांचे कौतुकास्पद आहे. सध्या देशात काय चाललयं, राज्यात काय चाललयं याची कल्पना सर्वांना आहे. न्याय मिळण्यासाठी वर्षोनुवर्षे वाट बघावी लागत आहे. इंग्रज काळात सुरू असलेले कायदे आजही अंमलात आणलेे जात आहेत. यात फेरबदल होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना शिवसेना नेते मुख्य प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी सांगितले की, अभिमान वाटावा अशी शिक्षण संस्था बबन पाटील यांनी येथे उभारली आहे, ते सच्चे शिवसैैनिक असून शिवसेनेशी पाटील कुटुंबिय ठामपणे आजही उभे आहेत. त्यांनी हे विधी महाविद्यालय सध्या उभारले आहे, आगामी काळात शैक्षणिक विद्यापीठ निश्‍चितच उभे राहील व या उभारणीसाठी आम्ही पूर्ण त्यांच्या पाठीशी उभे राहू, असेही त्यांनी सांगितले. तर यावेळी प्रास्ताविकात बोलताना संस्थेचे अध्यक्ष बबन पाटील यांनी सांगितले की, शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत असलेली इमारत आज उभारताना मला अत्यानंद होत आहे, आज प्रामुख्याने त्यांची व मॉ साहेबांची आठवण येत आहे. त्यांचे सुपूत्र उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते या महाविद्यालयाचे उद्घाटन होत असल्याने माझे स्वप्न साकार झाले आहे. गेली 27 वर्षे अविरत मेहनत करून शैैक्षणिक संस्था या परिसरात वाढविण्याचे काम केले आहे. आगामाी काळात शांत न राहता बाळासाहेब विद्यापीठ काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांंगितले. 

या कार्यक्रमाला मा.केंद्रीय मंत्री अनंत गीते, आ.सचिन अहिर, आ.जयंत पाटील, शिवसेना नेते मिलींद नार्वेकर, मा.आ.बाळाराम पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, जगदीश गायकवाड, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, गणेश पाटील, कैलास पाटील, दिनेश पाटील, महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, तालुकाप्रमुख विश्‍वास पेटकर, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, विभागप्रमुख गणेश म्हात्रे, मा.नगरसेेवक अतुल पलण, बाळाराम मुंबईकर आदींसह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...