Skip to main content

महाराष्ट्रा पोलीसांच्या अन्याया बाबत न्यायर्त पोलीस पत्नीचे आमरण उपोषण 15 ऑगस्ट 2022 रोजी आजाद मैदान येथे:

महाराष्ट्रा पोलीसांच्या अन्याया बाबत न्यायर्त पोलीस पत्नीचे आमरण उपोषण 15 ऑगस्ट 2022 रोजी आजाद मैदान येथे:

नवी मुंबई ( प्रतिनिधी) :

नवी मुंबई उलवे येथे राहणार्‍या संगीता डवरे त्यांचे पती पोलीस शिपाई हणमंत शंकर डवरे हे दिनांक 12 फेब्रुवारी 2022 रोजी टि. एस. चाणक्य, पाम बीच रोड सिग्नल वर कार्यातंर्गत कार्यरत असताना इनोवा क्रिस्टा गाडी नंबर MH 43 BE 9789 ह्या गाडीचा मालक हा स्वतः दारूच्या नशेत गाडी चालवत त्यांनी त्यांच्या पती पोलीस कर्तव्य बजावत असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास दारू पिऊन सुसाट गाडी चालवणारे गाडी मालक तथा त्यांचे ड्रायव्हर यांनी हणमंत डवरे यांच्या अंगावर चार चाकी गाडी घालून जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. त्या नंतर अपघात झाल्यावर जखमीस घटनास्थळी सोडून हॉस्पिटलमध्ये न नेता, गाडी सुसाट वेगाने घेऊन गाडी चालक तथा मालक फरार झाले. त्यामध्ये त्यांच्या पतीचे हात आणि पाय दोन्ही फॅक्चर, भरपुर मार लागला, त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी अपोलो हॉस्पिटल बेलापूर येथे M.I.C. केस नंबर 2974/2022 नुसार उपचार साठी ऍडमिट केले. परंतु अपोलो हॉस्पिटल व त्यांचे प्रमुख डॉक्टर प्रशांत अग्रवाल यांनी पोलिस हणमंत यांच्यावर चुकीचा उपचार करून चुकीची शस्त्रक्रिया केल्यामुळे भरपूर त्रास झाला असे त्यांच्या पत्नी कडुन सांगण्यात आले.

त्यावेळी त्यांना होणारा त्रास डॉक्टर्स ना सांगून योग्य औषधोपचाराची मागणी केली. परंतु अपोलो हॉस्पिटल बेलापूर व संबंधित ऑपरेशन करणारा स्टाफ कर्मचारी यांनी चुकीचे ऑपरेशन करून हणमंत यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्यांनंतर चुकीचे ऑपरेशन नंतर पुन्हा औषधोपचार करण्यास नकार दिला. या सर्व घटनाद्वारे त्यांना जीवे मारण्याचे  षड्यंत्र अपोलो हॉस्पिटलच्या संबंधित डॉक्टर , कर्मचारी, स्टाफ, मॅनेजमेंट स्टाप यांनी केले नंतर पुन्हा औषधोपचार करण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या पत्नी त्यांच्या पतीस घेवून एकायन हॉस्पिटल उलवे येथे उपचारासाठी दाखल केले. तेथे दाखल केल्या नंतर तेथील एकायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे सांगण्या नुसार अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे ऑपरेशन स्टाफने तुमच्या पतीचे चुकीचे ऑपरेशन व चुकीचे उपचारामुळे तुमचे पतीचे जीवितास धोका तथा अपंगत्व होण्याचे दाट शक्यता नाकारता येत नाही असे सांगितले. त्यावर त्यांच्या पत्नीने वारंवार अपोलो हॉस्पिटल विरुद्ध तक्रार करण्याचा प्रयत्न केला परंतु अपोलो हॉस्पिटल हे पैसे व बलाढ्य धनदांडग्यांचे हॉस्पिटल असल्यामुळे सर्व तक्रारीस विना कारवाई दुर्लक्षित केले. या सर्व प्रक्रियेत त्यांच्या पतीचे जीवन व आरोग्य वाचविण्यासाठी त्या पुन्हा एकायन हॉस्पिटलमध्ये नवीन उपचार घ्यावे लागले त्यामध्ये माझे लाखो रुपयाचे नुकसान तथा उपचार खर्च झाला त्यामुळे आता त्यांची पत्नी व कुटुंबीय आज पूर्णपणे कर्जबाजारी झाले असून त्यांच्या पतीस आयुष्यभरासाठी अपंगत्वास सामोर जावे लागले .

त्यांच्या पत्नी सांगितले या मधील घटनेस दोषी गाडी चालक, अपोलो हॉस्पिटल चे मॅनेजमेंट, डॉक्टर आणि तपास अधिकारी सर्वस्वी दोषी तर आहेतच परंतु या सर्वांनी माझे पतीचे मृत्यू संदर्भात षडयंत्र रचले. व पतीचा खून करण्याचा प्रयत्न केला . सुदैवाने माझे पतीस एकायन हॉस्पिटल मध्ये योग्य आणि वेळेवर उपचार मिळाल्यामुळे आजही माझे पतीचा जीव वाचला परंतु सध्या जख्मी अवस्थेत अपंगत्वास सामोरे जात आहेत . वरील सर्व घटना अयोग्य त्रुटीयुक्त तपास सुरू आहे हे समजले व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गेडेकर यांना दाखल गुन्हा तपासाचे अनुषंगाने वेळोवेळी तपास झाला, त्यातील प्रगती व पुराव्या बाबतची माहिती मागत असताना मला माहिती देणे तथा चौकशी करण्यास पोलीस उपनिरीक्षक गेडेकर यांनी नकार देऊन माहिती देण्यास टाळाटाळ तर केलीच, परंतु सदरचा गुन्हा दाखल तुम्ही मिटवून घ्या समोरची व्यक्ती फार मोठी पैसेवाली असून तुमच्या कुटुंबाचा घातपात तथा खून करेल. यावरून असे निदर्शनास येते की , अपघात घडविणारी व्यक्ती, अपोलो हॉस्पिटल डॉक्टर्स, कर्मचारी आणि तपासाधिकारी यांचे फार मोठे आर्थिक संगनमत झाले असून या सर्व आर्थिक संगणकामुळे माझे पतीसह माझ्यावर अन्याय तर झालाच झाला परंतु माझे पतीस आयुष्यभरासाठी अपंगत्व स्वीकारावे लागले. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर अशी वेळ आली असताना पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी ह्यांनी आरोपींसोबत आर्थिक संगनमत करून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर फार मोठा अन्याय करून केला आहे. त्यामुळे वरील सर्व घटनेची घटनेतील गंभीर गोष्टींची दाखल, गुन्ह्याची, गुन्ह्यातील अपूर्ण, आरोग्य त्रुटी, सदृश्य दोषयुक्त तपासाची आपण कसून सीआयडी तथा न्यायालयीन चौकशी करून दोषींवर लाच खाऊन केला भ्रष्टाचार, अपूर्ण अयोग्य, अधिकाराचा गैरवापर, सदोष उपचारादरम्यान पेशंटवर मानसिक दबाव व उपचारा दरम्यान दोषयुक्त उपचार झाल्यावर नवीन उपचार औषधास नकार देणे, पेशंटला मृत्यू तथा अपंग सदृश्य स्थितीत ढकलून देणे, आणि या सर्व गोष्टी नंतर आरोपींसोबत आर्थिक संगनमत करून दाखल गुन्ह्यांमध्ये दोषयुक्त त्रुटीद्वारे अन्याय अत्याचार करून माझे सह माझे कुटुंबीयावर फार मोठा अन्याय केला आहे. 

त्यामुळे वर नमूद सर्व संदर्भीय घटणांची आपण सीआयडी तथा न्यायालयीन चौकशी करून माझे झालेले नुकसान भरपाई सह मला तत्काळ न्याय देऊन दोषी घटक , दोषी तपास अधिकारी , अपोलो हॉस्पिटल , डॉक्टर व दोषी कर्मचारी अधिकारी यांचेवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करीत मला न्याय द्यावा ही नम्र विनंती 

तसेच, आपण जर दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी पर्यत वरील सर्व प्रकरणाचे आपण तात्काळ कसून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करीत दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून माझे नुकसान भरपाई सह मला न्याय न दिल्यास मी दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी आझाद मैदान मुंबई येथे जाहीर आमरण उपोषण करीन त्यास आपण सर्वस्वी जबाबदार रहाल असे संगीता हणमंत डवरे आणि कुटुंबीयांनी यावेळी वृत्तास सांगितले.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...