Skip to main content

न्यूज अपडेट - भूमिपुत्रांचा निश्चय आहे ठाम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव:

न्यूज अपडेट - भूमिपुत्रांचा निश्चय आहे ठाम नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव:

नवी मुंबई (प्रतिनिधी) :- दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळास देण्यात यावे अशी मागणी आज लाखोंच्या संख्येने भुमीपूत्रांनी सिडकोच्या घेराव आंदोलनात आज सहभागी होते. तसेच, १५ ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव मिळालं नाही तर १६ तारखेपासून विमानतळाचं काम बंद पाडू असा इशारा आंदोलकांनी मंचावरून घोषणा करत दिला. नवी मुंबईतील आंदोलकांच्या शिष्टमंडळानं सिडको भवनला जाऊन निवेदन दिलं.

शिष्टमंडळाने सिडको मुख्यालयात सिडकोचे व्यवस्थापकी (MD) संचालक संजय मुखर्जी यांची भेट घेवून भूमिपुत्रांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आमदार गणपत गायकवाड , माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार सुभाष भोईर, आमदार महेश बालदी, कृती समितीचे सदस्य दशरथ भगत, जे.डी. तांडेल, भूषण पाटिल आदि उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण संदर्भात केलेला ठराव रद्द करावा आणि लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाने नवीन ठराव करावा अशा प्रकारची मागणी शिष्टमंडळाने सिडकोकडे केली.

24 जून लोकनेते दि.बा.पाटील यांचा स्मृतिदिन. या  दिवसाचे औचित्य साधत हा दिवस स्मृतिदिन नसुन स्फूर्तिदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय सर्व भुमिपूत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या वतीने घेण्यात आला . त्यानुसार नामकरणाच्या मुद्यावर सिडकोला घेराव घालण्याचे आंदोलन करण्यात आले. यासाठी नवी मुंबई, पनवेल, उरण मधील गावांगावांमध्ये गाव बैठका घेतल्या गेल्या. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून १० जून रोजी मुंबई, नवी मुंबई, पनवेल, उरण , ठाणे, कल्याण - डोंबिवली इथे मानवी साखळी आंदोलन करण्यात आले होते. या साखळी आंदोलना नंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळानी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. परंतु या बैठकीत मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरच ठाम दिसून आले. त्यानंतर मात्र नामकरणाचा हा मुद्दा चांगलाच चिघळला. २४ जूनच्या आंदोलनावर निश्चित राहण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. 

त्यानुसार केवळ गावातच नव्हे तर सोशल मिडियावरही प्रचाराला सुरूवात झाली. पोलिसांनी सिडको भवन मुख्यालयाबाहेर होणार्‍या आंदोलनाला परवानगी नाकारली असतानाही आंदोलक मात्र आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होते . त्यामुळे आंदोलनासाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाजवळ पाम बीच मार्गावरील नेरूळ- उरण रेल्वे पुलाखाली जागा देण्यात आली. आंदोलनस्थळी येण्यासाठी पोलिसांनी जागोजागी वाहतुकीत बदल करूनही लाखोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते.

तर यावेळी आंदोलनात लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार व माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, काँग्रेस माजी मंत्री हुसेन दलवाई, माजी मंत्री रवीशेठ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, आमदार राजू पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार रमेश पाटील, आमदार मंदा म्हात्रे, माजी आमदार सुभाष भोईर, माजी आमदार संदीप नाईक, माजी आमदार योगेश पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, गुलाबराव वझे, कॉ. भूषण पाटील, म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जे. डी. तांडेल, दशरथ भगत, मयुरेश कोटकर, यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध पक्ष, संघटना, वारकरी सांप्रदाय, कलाकार वर्ग, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक रायगड, नवी मुंबई, पालघर, ठाणे, शहापूर, नाशिक, कल्याण, डोंबिवली भागातून लाखोंच्या संख्येने भूमिपुत्र सहभागी झाले होते.

● महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली-

योगायोगाने आजच्या या दिवशी वटपौर्णिमेचे उपवास असल्याने आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी आंदोनस्थळीच वटपौर्णिमेचे व्रत पूर्ण केले. आंदोलनात वडाच्या रोपाची पूजा व फेरे मारत वटपौर्णिमेचा सन साजरा करत दि.बा. पाटिल यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावेच लागेल तो पर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका महिला वर्गानी दिली.

● पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त-

प्रकल्पग्रस्त आंदोलनकांनी सिडको भवन पर्यंत पोहोचू नये यासाठी आंदोलस्थळावर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. नवी मुंबई पोलिसांसह राज्य राखीव दलाची तुकडी, फौज तैनात करण्यात आली होती. पोलिसांचे पण चांगले सहकार्य यावेळ

● फक्त दिबांचेच नाव अन्यथा १९८४ च्या पेक्षा मोठी क्रांती घडेल - दशरथदादा पाटील 

१९५८ साली भूमिपुत्रांसाठी संपूर्ण आयुष्य दिबांनी वेचले. १९८४ सालचा लढा असो किंवा इतर लढे, अशा अनेक लढ्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे . कुळकायदा पॅटर्न मुळे देशात न्याय प्रस्थापित झाला त्यामुळे दिबा देशाचे नेते होते. दिबांच्या नेतृत्वाखाली १९८४ च्या लढ्यात मी माजी खा. रामशेठ ठाकूर, दत्तूशेठ पाटील असे अनेक जणांनी काम केले त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा, वैचारिक प्रगल्भता, संपूर्ण आयुष्य त्यांनी बहुजन समाजासाठी खर्च केले आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिबांचेच नाव देण्यात यावे दुसरे नाव दिले तर १९ ८४ च्या पेक्षा मोठी क्रांती घडेल.

● सिडकोने ठराव बदलून दिबासाहेबांच्या नावाचा करावा - लोकनेते रामशेठ ठाकूर 

वंदनीय दिबासाहेब यांनी सर्व समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. त्यांच्या नावासाठी सर्व समाज एकवटला आहे. ९९ टक्के समाज आणि विविध पक्ष, संघटना, संस्था, सांप्रदाय दिबांच्या नावासाठी आग्रही आहे. ७० पेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दिला आहे. हा उत्साह कायम ठेवा सरकारला दिबासाहेबांचे नाव दिल्याशिवाय पर्याय उरणार नाही. सिडकोने ठराव बदलून दिबासाहेबांच्या नावाचा करावा आणि राज्य सरकारला पाठवावा.

● दिबांचे नाव विमानतळाला दिल्याशिवाय भूमिपुत्र गप्प बसणार नाही - माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण 

लोकनेते दि. बा. पाटील यांनी त्यावेळी सरकारच्या विरोधात आंदोलन करून भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिले. माझी जन्मभूमी मुंबई असली तरी माझी कर्मभूमी कोकण आहे, येथील प्रत्येक माणूस दिबांचा आहे. भूमिपुत्रांबद्दल मुख्यमंत्र्यांना जराही आपुलकी नाही. दिबांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिल्याशिवाय भूमिपुत्र गप्प बसणार नाही.

● विमानतळ होत आहे हि भूमिपुत्रांची मेहरबानी भूमिपुत्राला विसरू नका आणि हे पाप करू नका- काँग्रेसनेते हुसेन दलवाई 

बाळासाहेब ठाकरे नेहमी भूमिपुत्रांच्या बाजूने उभे राहिले, स्वर्गात त्यांनाही दिबासाहेबांचे नाव मान्य असेल ते उद्धव ठाकरेंच्या स्वप्नात येतील आणि त्यांना सांगायचे ते सांगतीलच. दिबा फक्त भूमिपुत्रांचे विचार करायचे. विमानतळ होत आहे हि भूमिपुत्रांची मेहरबानी आहे. त्यामुळे भूमिपुत्राला विसरू नका आणि हे पाप करू नका. बाळासाहेब  यांचे स्मारक भव्य दिव्य व्हावे पण नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव मिळावे. येथील भूमिपुत्र शांत आहे तर तुम्ही त्याला डिवचले तर बंदूकीलाही घाबरत नाही. सन्मानाने चर्चा करा मार्ग काढा. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात एकवटली आहे आणि या लढ्यात दशरथ दादांना सहभागी करून या खऱ्या लढाऊ वाघाला जिवंत केले आहे.

● जो पर्यंत दिबासाहेबांचे नाव विमातळाला मिळत नाही तो पर्यंत हा लढा सुरूच ठेवून जिंकायचा आहे - आमदार प्रशांत ठाकूर 

विमानतळाचे काम पूर्ण नसतानाही आणि कोविडचे भयंकर संकट असतानाही मागणी आणि तात्काळ ठराव भूमिपुत्रांच्या माथी मारण्याचे प्रयोजन राज्य सरकारने केले. दिबासाहेबांचे नाव डावलून भूमिपुत्रांना डिवचण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. २००८ सालापासून दिबांच्या नावाची मागणी असतानाही ठाकरे सरकारने प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी जो पर्यंत दिबासाहेबांचे नाव विमातळाला मिळत नाही तो पर्यंत हा लढा आपल्याला सुरूच ठेवून जिंकायचा आहे . दिबासाहेबांची आण ठेवून रायगड पासून मुंबई अगदी नाशिक पर्यंतची दिबासमर्थक या आंदोलनात सहभागी झाले . त्यामुळे नुसती हाक दिली आणि दिबांच्या नावासाठी जनसागर एकवटला आहे. 

● प्रकल्पग्रस्तांना लॉलीपॉप देण्याचा ढोंगी प्रयत्न सुरु केला आहे - आमदार महेश बालदी 

महाविकास आघाडीचे हे सरकार उद्या असेल का नसेल हे त्यांना माहित नाही म्हणून त्या भितीपोटी ठराव करून नाव देण्याचा घाट घातला आहे. वाढीव गावठाण पक्के करण्यासंदर्भात अनेक वर्षांपासून मागणी आणि संघर्ष सुरु आहे पण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या संदर्भात मागणी पत्र देऊन प्रकल्पग्रस्तांना लॉलीपॉप देण्याचा ढोंगी प्रयत्न सुरु केला आहे, त्याला प्रकल्पग्रस्त भुलणार नाही. राज्यात अनेक प्रकल्प आहेत त्यातील दहा प्रकल्पांना बाळासाहेबांचे नाव द्या पण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त दि. बा. पाटील यांचेच नाव दिले पाहिजे .

● विरोधकांनी राजकारण करू नये. दिबांचे कार्य महान आहे - मंदा म्हात्रे 

प्रकल्पसाठी आणि देशाच्या विकासासाठी आमच्या शेतकऱ्यांनी पिकत्या जमिनी दिल्या आहेत. आमच्या घराच्या भिंती, गाड्या दिबासाहेबांच्या आशीर्वादामुळे आहेत, त्यामुळे विरोधकांनी राजकारण करू नये. दिबांचे कार्य महान आहे. त्यामुळे विधिमंडळात २०१९ मध्येच विमानतळाला त्यांचे नाव द्यावे हि मागणी केली आहे. आम्ही आमच्या हक्क मागत आहोत भीक मागत नाही.

● भूमिपुत्र पण शिवसैनिक आहेत हे लक्षात असू द्या - आमदार गणपत गायकवाड

दिबांच्या नावाची मागणी होत असताना अचानक ठिणगी टाकण्याचे काम झाले आहे. राज्यात महाविकास आघाडीची हुकूमशाही सुरु झाली आहे. त्यामुळे आता मुलाच्या किंवा मुलींच्या लग्नात त्यांच्या मुलांची नाव ठेवण्याची संस्कृती येईल. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्ही आंदोलन केले तर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील अशी धमकी देत सुटले. असे असतात का मुख्यमंत्री ? हे मुख्यमंत्री आहेत ना असे केले तर कसे राज्य चालवणार. भूमिपुत्र पण शिवसैनिक आहेत हे लक्षात असू द्या. नाही तर ठाणे रायगडमध्ये शिवसेना उरणार नाही. मुख्यमंत्री महोदय खालच्या लोकांचे ऐकून वागाल तर आंदोलन करायला तुम्हाला भाड्याने लोकं आणावी लागतील.

● महाराष्ट्राची परंपरा आईबापाचे नाव देण्याची नाही हे लक्षात घ्या - जगन्नाथ पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन बैठक झाल्या. २० जूनच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे वागणे अत्यंत चुकीचे होते. बालहट्टाप्रमाणे वागले, बैठकीतून उठून गेले. आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात अशी वेदनादायी घटना घडली नसेल पण उद्धव ठाकरे यांनी ती केली. हडलप्पी करत पित्याच्यानावासाठी महाराष्ट्राची परंपरा संस्कृती मोडीत काढली. महाराष्ट्राची परंपरा आईबापाचे नाव देण्याची नाही हे लक्षात घ्या आणि लक्षावधी भूमिपुत्र जागा जागरूक झाला आहे हे ध्यानात ठेवा.

● मुख्यमंत्री पक्षाचा नसतो जनतेचा असतो- आमदार रमेश पाटील 

दिबांनी भूमिपुत्रांसाठी त्याग केला आहे. दिबांच्या कार्याची उंची मोजण्याचे प्रयत्न करू नका. मुख्यमंत्री पक्षाचा नसतो जनतेचा असतो. त्यामुळे भूमिपुत्रांवर अन्याय करू नका. दिबांच्या नंतर भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर करीत आहेत. वेळ पडल्यास यापेक्षा 20 पटीने आंदोलनकर्ते पुढच्यावेळी दिसतील.

● दिबांचेच नाव लागले पाहिजे आणि त्यासाठी समाज काहीही करेल - आमदार राजू पाटील 

आंदोलनाची परिस्थिती आणून विखुरलेला आमचा समाज एकत्र करण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आमदार एकनाथ शिंदे यांनी केला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. पण विमानतळाला दिबांचेच नाव लागले पाहिजे आणि त्यासाठी समाज काहीही करेल आणि ते तुम्हाला दिसेलच.

● भूमिपुत्रांनी या आंदोलनातून ताकद दाखवून दिली आहे - संतोष केणे 

भूमिपुत्रांनी या आंदोलनातून ताकद दाखवून दिली आहे. नामदार एकनाथ शिंदे पालकमंत्री म्हणून तुम्हाला जाग आली नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विसर पडला का? ठाण्याचे वाघ समजत असाल पण भूमिपुत्र कागदावरचे नाही तर खरे वाघ आहेत हे लक्षात ठेवा.भूमिपुत्र कागदावरचे नाही तर खरे वाघ आहेत हे लक्षात ठेवा संतोष केणे भूमिपुत्रांनी या आंदोलनातून ताकद दाखवून दिली आहे. नामदार एकनाथ शिंदे पालकमंत्री म्हणून तुम्हाला जाग आली नाही, तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विसर पडला का ? ठाण्याचे वाघ समजत असाल पण भूमिपुत्र कागदावरचे नाही तर खरे वाघ आहेत हे लक्षात ठेवा. 

● उचलली जीभ लावली टाळ्याला असे चालत नाही - ह. भ. प. प्रकाश म्हात्रे 

उचलली जीभ लावली टाळ्याला असे चालत नाही पण नामकरणात या ठाकरे सरकारने तसेच केले आहे . जनतेने तुम्हाला डोक्यावर बसवले तेच तुम्हाला पायदळी तुडवतील हे लक्षात घ्या तसे नको व्हायला तर विमानतळाला दिबांचे नाव द्या. 

● भूमिपुत्रांनी घाबरण्याची गरज नाही. जिंकू किंवा मरू विमानतळाला दिबांचेच नाव देऊ - जगदिश गायकवाड 

लोकनेते रामशेठ ठाकूर, दशरथदादा पाटील, जगन्नाथदादा पाटील या त्रिमूर्तीची आणि आजी माजी आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी, विविध पक्ष संस्था संघटनांची, तरुण, महिला, ज्येष्ठांची ताकद भूमिपुत्रांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आपले तरुण अजून तापले नाहीत ते तापले तर राज्य सरकारला सलो का पळो करून सोडल्याशिवाय राहणार नाहीत. भूमिपुत्रांनी घाबरण्याची गरज नाही. जिंकू किंवा मरू विमानतळाला दिबांचेच नाव देऊ. शिवसेनेला आगरी कोळी समाजाने मोठी केले आहे . दिबांचे नाव दिले नाही तर सोलल्याशिवाय राहणार नाही. मधल्या हरामखोरांनो भूमिपुत्र पेटून उठले आहेत हे याद राखा.









महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...