Skip to main content

न्यूज अपडेट: अफगाणिस्तानातील १० वर्षाच्या मुलावर बोरिवलीतील एचसीजी कॅन्सर सेन्टर येथे जीवघेण्या आजारावर यशस्वी उपचार:

न्यूज अपडेट: अफगाणिस्तानातील १० वर्षाच्या मुलावर बोरिवलीतील एचसीजी कॅन्सर सेन्टर येथे जीवघेण्या आजारावर यशस्वी उपचार:  

नवी मुंबई (प्रतिनिधी/अक्षय तांडेल) :- गेल्या वर्षभरात कोरोना संक्रमणामुळे अनेक नागरिक भारतात उपचारासाठी येऊ शकले नाही तसेच अनेक रुग्णांना भारतात उपचारासाठी येण्याची इच्छा असून त्यांना व्हिसासाठी लागणारी कागदांची पूर्तता, कोरोना संक्रमणामुळे करावे लागणारे विलीगकरण अशा समस्यांना तोंड  द्यावे लागत आहे परंतु भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने एका काबुल येथील दहा वर्षाच्या मुलाच्या दुर्मिळ आजारावर योग्य वेळी उपचार उपलब्ध झाले. काबुल अफगाणिस्तान येथे राहणाऱ्या रशिदवर (नाव बदलेले आहे) हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टीयोसाइटोसिस (Hemophagocytic lymphohistiocytosis) या अत्यंत दुर्मिळ आजारावर बोरिवलीतील एचसीजी कॅन्सर सेन्टर (HCG Cancer Center), इथे यशस्वी उपचार करून त्याला जीवनदान मिळाले आहे.

हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टीयोसाइटोसिस (Hemophagocytic lymphohistiocytosis) हा जीवघेणा सिन्ड्रोम (तापाचा प्रकार) असून यामध्ये प्रतिकारशक्ती कमी होत जाऊन  फक्त ५ टक्के वाचण्याची आशा असते व यासाठी  म्हणजे लोजेनिक हेमेटोपोएटिक स्टेम सेल प्रत्यारोपण करणे गरजेचे असते. बोरिवली येथील एचसीजी कॅन्सर सेन्टरमध्ये रशीदला (hemophagocytic lymphohistiocytosis syndrome)  हेमोफागोसिटिक लिम्फोहिस्टीओटोसिटोसिस सिंड्रोमसह सादर केले तेंव्हा मंक (13-14) (यूएनसी १३ डी) जनुकातील उत्परिवर्तनांद्वारे टाइप ३ चे निदान झाले जे वैद्यकीय भाषेत प्राणघातक मानले जाते ज्यावेळी रशिद  बोरिवलीमध्ये आला त्यावेळी त्याला कमी ऐकू येत होते तसेच त्याच्या उजव्या डोळ्यामध्ये दृष्टी कमी झाली होती. 

रशिदच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार रशिदला २०१८ मध्ये साधा ताप आला होता व  हळूहळू त्याची प्रतिकारशक्ती कमी होत गेली, २०१८ मध्ये त्याला पाकिस्तानमध्ये नेण्यात आले पंरतु तिथे डॉक्टरांना या आजाराचे निदान करता आले नाही , नंतर त्याला दुबईला नेण्यात आले कारण रशिदचे वडील दुबईत टॅक्सी ड्रायव्हरचे काम करतात दुबईच्या डॉक्टरांनी या आजाराचे निदान केले स्टेम सेल प्रत्यारोपणासाठी भारतामध्ये जाण्याचा सल्ला दिला. 

चार वर्षांपूर्वी रशिदच्या भावाचा याच आजाराने मृत्यू झाला होता. एचसीजी कॅन्सर सेन्टरचे डॉ. सूरज चिराणिया, हेमॅटोऑन्कोलॉजी आणि बीएमटी तज्ञ  यांच्या देखरेखीखाली रशीदचे उपचार सहा महिन्यापूर्वी सुरु झाले, कोरोना संक्रमण असल्यामुळे सुरुवातीला फक्त विडिओ कॉल मार्फत मार्गदर्शन सुरु होते, नंतर दोन्ही देशातील  परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने राशिदला गेल्या महिन्यात भारतात आणले व त्याच्यावर स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले. यामध्ये मेंदू व हृदयाचा संबंध असल्यामुळे ही शल्यचिकित्सा फारच जोखमीची समजली जाते.

 याविषयी अधिक माहिती देताना एचसीजी कॅन्सर सेन्टरचे डॉ. सूरज चिराणिया, हेमॅटो ऑन्कोलॉजी आणि बीएमटी तज्ञ म्हणाले, "रशिदच्या कुटुंबीयांना या जोखमीच्या शल्यचिकित्सेची माहिती दिली कारण रशिदचा जंतुसंसर्ग झालेला बॉन मॅरो केमोथेरेपीच्या उपचाराने काढणे गरजेचे होते तसेच रशीदचे नशिब बलवत्तर होती कारण रशीद बरोबर त्याचा दुसरा भाऊ भारतात आला होता त्याचा बोने मॅरो जुळला गेला. अप्रेसिस या आधुनिक उपकरणाच्या मदतीने ऑपरेशन न करता स्टेम सेलचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. 

अनुवांशिक कारणामुळे हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टीओटोसिस (एचएलएच) हा अत्यंत घातक आजार शरीरात निर्माण होतो. प्रत्यारोपणानंतरचा काळ हा रुग्णांसाठी कठीण समजला जातो कारण अशा प्रकारे प्रत्यारोपण केलेल्या  ४० टक्के रुग्णांना  गंभीर व्हेनो-अक्रुल्युव्ह लागण , कॅन्डिडा पॅरासिलोसिस सेप्सिस, स्टिरॉइड-रेफ्रेक्टरी ग्रेड चतुर्थ गटात जीव्हीएचडी सारख्या गुंतागुंतीच्या समस्या भविष्यात होऊ शकतात  तसेच  यकृत, मूत्रपिंड आणि फुफ्फुसात बिघाड होऊ शकतो त्यामुळे आम्ही परंतु अत्यंत काळजीपूर्वक व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने  हे प्रत्यारोपण यशस्वीरित्या केले आहे, कारण कोणत्याही परिस्थितीत त्याचा जीव वाचविणे ही आमची प्राथमिकता होती." 

आमचा तीन वर्षांचा संघर्ष संपला असून मी माझ्या मुलाचे प्राण वाचवू शकलो हीच माझ्या मोठ्या मुलाला श्रद्धांजली आहे कारण माझ्या मोठ्या मुलाला मी वाचवू शकलो नाही तसेच माझी आर्थीक स्थिती खूपच खराब असल्यामुळे एचसीजी कॅन्सर सेन्टरचे डॉ. सूरज चिराणिया व त्यांच्या टीमने क्रावूड फंडिंग  म्हणजेच ऑनलाईन पैसे  जमविण्यासाठी मदत केली त्यामुळे आम्ही हे उपचार करू शकलो अशी भावना रशिदच्या वाडिलांनी बोलून दाखविली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रशिद काबूलला परतला असून गेले पंधरा  दिवस एचसीजी कॅन्सर सेन्टरचे डॉक्टर विडिओ कॉल व इंटरनेटच्या माध्यमातून लक्ष देत असून त्याची तब्येत आता सुधारत आहे.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...