ब्रेकिंग न्यूज: संजय राठोडा यांची मुख्यमंत्र्याकडे विनंती..राजीनामा देतो, चौकशी झाली की स्वीकारावा: ■ संजय राठोड 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले. त्यावेळी राजीनामा देतो पण चौकशी झाल्यावर तो मंजूर करा अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं समजले आहे. नवी मुंबई (बातमी/मुंबई) :- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दबाव वाढत आहे. अधिवेशनाच्या आधी संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू न देण्याचा इशारा भाजपने दिलाय. त्यामुळे आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'वर्षा' वर मुख्यंमंत्र्यांची भेट घेतली आणि राजीनामा देतो पण चौकशी झाल्यावर तो मंजूर करा अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि संजय राठोड यांच्यादरम्यान चर्चा सुरु आहे. यावेळी एकनाथ शिंदे आणि अनिल परबही उपस्थित आहेत. आता संजय राठोड यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर शनिवारी सकाळी संजय राऊत यांनी सूचक विधान केलं ...