Skip to main content

न्यूज अपडेट : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विरोधी पक्षाला इशारा; कोणत्याही थराला जाऊन आम्ही उत्तर देऊ आम्ही घाबरत नाही:

न्यूज अपडेट : शिवसेना खासदार संजय राऊत यांचा विरोधी पक्षाला इशारा; कोणत्याही थराला जाऊन आम्ही उत्तर देऊ आम्ही घाबरत नाही:

नवी मुंबई (मुंबई-प्रतिनीधी/अशोक वाघमारे) :- महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनवण्याच्या प्रक्रियेतील जी प्रमुख लोकं आहेत . ही लोकं जेव्हा राजकीय दबावाला बळी पडत नाही तेव्हा त्यांना असे कागदाचे तुकडे पाठवले जातात.याला वैफल्य म्हणतात. ही भाजपची हतबलता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी आहे , असे आपण म्हणतो , तर समोर येऊन लढा. घरातली मुले आणि महिलांवर हल्ले करण्याला नामर्दानगी म्हणतात. अशी नामर्दानगी जर कुणी करत असेल तर , शिवसेना त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देईल. कोणत्याही थराला जाऊन आम्ही उत्तर देऊ आम्ही घाबरत नाही , असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे . शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी देखील आपली चर्चा झाली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली .

संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयने ( ईडी ) नोटीस बजावली आहे . त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत ईडीच्या नोटिशीसंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर टीकेची तोफा डागली. ईडी आमच्यासाठी काही महत्त्वाचा विषय नाही . सीबीआय , ईडी किंवा आयकर विभाग असेल यांना कधीकाळी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती . पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणे कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणे हे आता लोकांनी गृहीत धरले आहे. केंद्रातील पक्षाला जेव्हा विरोधकांना राजकीयदृष्ट्या संपवता येत नाही. तेव्हा अलीकडच्या काळातील ईडी , सीबीआय , आयकर विभाग सारखी हत्यारे वापरावे लागत आहेत , अशी टीका संजय राऊत यांनी केली .

गेल्या दीड महिन्यापासून ईडी आमच्याकडे पत्रव्यवहार करत आहे. त्यांना काही माहिती कागदपत्र हवी होती. ती कागदपत्रे आम्ही त्यांना वेळोवेळी पुरवलेली आहेत. पण ईडीच्या कुठल्याही पत्रात त्यांनी असे कळवले नाही की हा पीएमसी बँक घोटाळा आहे. जर ईडीने त्यांच्या पत्रात यासंदर्भात काहीही उल्लेख केलेला नाही की, त्यांना कशा करता चौकशी करायची आहे. तर भाजपची माकडे कालपासून उड्या मारत आहेत पीएमसी बँक , पीएमसी बँक यांना सांगितले कोणी ? यांची आणि ईडीची काही हात मिळवणी आहे का ?, असा सवाल संजय राऊत यांनी केला. ईडीच्या बॅलर्ड पियर येथील कार्यालयात कोणत्या भाजप नेत्यांचा वावर आहे हे तपासावे. त्यातून ईडीच्या कार्यालयात वावर असणारे नेते कोण हे स्पष्ट होईल. तीन महिन्यात भाजपचे तीन लोक ईडीच्या कार्यालयात जातात , तिथून काही कागद बाहेर काढून माहिती लीक करतात . माझ्याकडे पुरावे आहेत , असा खुलासाही त्यांनी केला . यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील धारेवर धरले कालच मी देवेंद्र फडणवीसांचे ऐतिहासिक विधान ऐकले.ते असे म्हणाले की काही चुकीचे केले नसेल तर घाबरायचे कशाला ? नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे का ? मी परत सांगतो , आमच्यापैकी कुणी काहीही चुकीचे केले नाही . नोटीस येऊद्या किंवा आणखी काही येऊ द्या . आम्ही घाबरत नाही , भविष्यात तुम्हाला घाबरावे लागले , असा सूचक इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे .

गेल्या वर्षभरामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार असतील प्रफुल्ल पटेल , एकनाथ खडसे , प्रताप सरनाईक , माझ्या नावाचा गजर तुम्ही करत आहात.महाराष्ट्राचे सरकार बनवण्याच्या प्रक्रियेतील जी प्रमुख लोकं आहेत त्यांना या ना त्या कारणाने त्रास दिला जात आहे.जे राजकीय दबावाला बळी पडत नाही त्यांना अशी नोटीस पाठवली जातात.महाराष्ट्राचे सरकार टिकू देऊ नका असा इशारा भाजपचे नेते देत आहेत . तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका . हे सरकार आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाडायचे ठरवले आहे , असे भाजप नेते म्हणत आहेत . शिवसेनेच्या २२ लोकांच्या नावांची यादी दाखवली गेली . त्या लोकांना ईडीच्या नोटिसा जारी करा , त्यांच्यावर दबाव आणणे हे तंत्र अवलंबले जात असल्याचा धक्कादायक खुलासाही संजय राऊत यांनी केला.मी तोंड उघडले तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसतील . भाजपच्या दिग्गज नेत्यांना नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारखे परदेशात पळून जावे लागेल , असा हल्लाबोल त्यांनी चढवला .

हा तर संजय राऊतांचा कांगावा ईडी ने पाठवलेल्या नोटिशीबाबत शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे निव्वळ कांगावा होता . ईडी ने चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवली असं वाटत असेल तर खा.राऊत यांनी ईडी विरोधात खुशाल न्यायालयात जावे , असे प्रतिपादन भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले.खा.राऊत यांची पत्रकार परिषद ही फक्त आणि फक्त कांगावा करण्यासाठी होती . राजकीय षड्यंत्र वगैरे गोष्टी बोलण्यापेक्षा राऊत यांनी त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या नोटिशीबाबत ईडी कडे समाधानकारक उत्तर सादर करावे . ईडी ने चुकीच्या पद्धतीने नोटीस पाठवली असेल तर राऊत यांना ईडी विरुद्ध न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहे.उपाध्ये यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की , सोमवारी सकाळपर्यंत नोटीस मिळालीच नाही असे म्हणणाऱ्या राऊत यांनी लगेच पत्रकार परिषद घेतली.पत्रकार परिषद घेण्याऐवजी त्यांनी नोटीस का बजावली गेली यामागच्या कारणांचा शोध घ्यावा व ईडी पुढे आपले म्हणणे सादर करावे.तसे करण्याऐवजी खा.राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन कांगावा करण्याचा मार्ग स्वीकारला , असेही उपाध्ये यांनी नमूद केले.






महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...