कोरोना अपडेट : खोपोली येथील "रमाधाम वृद्धाश्रमात" नुतन वास्तू कार्यक्रम संपन्न : पनवेल (खोपोली/प्रतिनिधी) : खोपोली येथिल "रमाधाम वृद्धाश्रमाच्या" नुतन वास्तूच्या वास्तुशांती चा कार्यक्रम २९ ऑगस्ट रोजी सकाळी जेष्ट पाहुण्याच्या उपस्तिथित संपन्न झाला, या वेळेस माननीय श्री. सुभाषजी देसाई साहेब, श्री. अनिलजी देसाई, श्री. आदेशजी बांदेकर, श्रीमती रमाबाई केशव ठाकरे संस्थेचे अध्यक्ष श्री. चंदुमामा वैद्य, श्री. बबनदादा पाटील, श्री. महेंद्रजी थोरवे यांच्या उपस्थितीत पार पडला. "आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला सुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणाची, आपली काळजी घेतली जाण्याची गरज निश्चित असते. तेथे पैसा, मालमत्ता काहीही उपयोगी पडणार नाही याचे भान प्रत्येक व्यक्तीने ठेवणे ही काळाची गरज बनलेली आहे. प्रत्यक्ष तिथे जाणे ही वेगळी गोष्ट, पण जाण्याची मानसिकता तयार करायला सुरुवात केली तर सर्व परिस्थितीकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहायला सुरुवात होईल हे नक्कीच", वृताशी बोलताना श्री. बबनदादा पाटील यांनी त्यांच्या मनातल्या भावना वृद्धाश्रमा बद्द्ल व्यक्त केल्या. महत्त्वाची टीप : सर्वांन...