Skip to main content

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना शाखा मोरावे गाव व उलवे नोड़ विभाग २,३,५ नवी मुंबई कडुन हार्दिक शुभेच्छा..!!!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना शाखा मोरावे गाव व उलवे नोड़ विभाग २,३,५ नवी मुंबई कडुन हार्दिक शुभेच्छा..!!!


मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे,
"निश्चय निर्धाराने महाराष्ट्ररणीं फडकला भगवा.
कार्यकुशलतेने आपणासम पाईक हा संकटांशी निर्भीडपणे लढला".
"जाज्वल्य महाराष्ट्राची स्वाभिमानी कीर्ती लहरु दे गगना.
देव,देश अन् धर्म रक्षण्या उद्धवजींना देऊ शुभकामना.
"उद्धवनीती..चाणाक्षनीती..विजयनीती"..!!



नवी मुंबई(उलवे/प्रतिनिधि)- आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजींचा जन्मदिवस. प्रस्थापित राजकारणातील एक वेेेगळा चेहरा. ज्यावेळी शिवसेना पक्षाची धुरा त्यांच्याकडे सोपविली तेव्हा प्रचंड आव्हानांचा सामना त्यांना करावा लागला. पण जीभेवर साखर, डोक्यावर बर्फ आणि आभाळाएवढ्या वडीलांची पुण्याई - या त्रिसूत्री भांडवलावर मा.उद्धवजींनी त्यांची कारकिर्द सुरू केली.


सुरूवातीला प्रचंड टीका,आक्षेप व निंदा त्यांच्या पदरी आली. पण न डगमगता निर्भीडपणे आणि विनयशीलतेने मा.उद्धवजींनी आपलं असं वेगळं स्थान निर्माण केलं. या संघर्षमय प्रवसात त्यांनी सर्वच विरोधकांना अतिशय थंड डोक्याने,तिरक्या चालीने संपूर्णतः भुईसपाट केलं. त्याचबरोबरच शिवसेना पक्षाला आधी कधीच मत देण्याची शक्यता नसलेल्या लोकांचाही आदर व विश्वास कमावला. त्याचेच फलित म्हणजे शिवसेनेकडे आज असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद. त्याहून अभिमानाची गोष्ट म्हणजे त्या पदावर विराजमान शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे.


शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री मा.उद्धवजी शिवसेनाप्रमुखांच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेला एक लढवय्या सैनिक आहे. एकदा जबाबदारी स्वीकारली की मात्र मागे फिरणं नाही, मग परिस्थिती कोणतीही असो, हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलंय. आपले शिवसैनिक हेच आपलं भांडवल आहे. जनतेशी असलेली बांधिलकी आणि हिंदुत्वाशी असलेली निष्ठा हीच आपली जन्मोजन्मीची संपत्ती आहे, हा विचार मा.उद्धवजींच्या कार्यातून दिसून येतो.


सद्यपरिस्थितीत सुद्धा कोरोना,निसर्ग चक्रीवादळ तसेच विरोधकांच्या ढोंगी विरोधाला विरोधाशी लढताना स्वकीयांसोबत विरोधकांनाही सन्मानाने,समजूतदारपणे सोबत घेऊन अखंड महाराष्ट्राला धीर देणारा एक आश्वासक मुख्यमंत्री त्यांच्यात दिसतोय. कित्येक वर्षांनंतर कुटुंबासम महाराष्ट्राच्या तमाम जनतेची काळजी वाहणारा मनस्वी माणूस व जबाबदार नेता मा.उद्धवजी यांच्यारूपाने राज्याने पहिला असेल.


मा.उद्धवजी या अपूर्व कठीण परिस्थितीशी सक्षमपणे लढत आहेत व वेळोवेळी अखंड महाराष्ट्राला धीर देत आलेले आहेत, याचा एक शिवसैनिक म्हणून आम्हां सर्वांनाच सार्थ अभिमान आहे. या लढ्यातून आपण सर्व लवकरच सुखरूप बाहेर पडू. 


मा.उद्धवजी आपल्याला या जन्मदिनी खूप खूप शुभेच्छा. आपल्याला उदंड निरोगी व यशस्वी दीर्घायुष्य लाभो. महाराष्ट्रासह हिंदुस्थानची सेवा आपल्या हातून सदैव घडत राहो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.


सल्लागार: मा. श्री. अंकुश विश्वनाथ म्हात्रे


( शिवसेना शाखा मोरावे गाव व उलवे नोड़ 
सेक्टर २,३,५ नवी मुंबई. )


 



महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...