सातजणांनी मतिमंद मुलीवर केले अमानुष लैंगिक अत्याचार; आरोपी नराधमांना अटक :
रेवदंडा (अलिबाग) : जगभर लॉक डाउन परिस्तिथी असताना, अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील एका मतिमंद मुलीवर सातजणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिडीत मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी रेवदंडा पोलिसांनी सातजणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रेवदंडा येथील पिडीत मुलगी तीच्या आई वडीलांसोबत राहते. ही मुलगी थोडीशी मतिमंद आहे. याचा गैरफायदा नराधमांनी घेतला, परिसरातील त्या सातही जणांची तिच्यावर लैंगिक अमानुष अत्याचार केले. गेल्या काही महिन्या पासून हे सातजण आळी पाळीने तिच्यावर अमानुष लैंगिक अत्याचार करत होते.
मुलीला त्रास होऊ लागल्यामुळे घरच्यांनी तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांना ती मुलगी गर्भवती असल्याचे लक्षात आले. याची माहिती डॉक्टरांनी मुलीच्या घरच्यांना व रेवदंडा पोलिसांना तात्काळ दिली. त्यानंतर त्या सातही नराधमांची नावे पुढे आली. या सर्वांविरोधात रेवदंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सातही जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास डि.वाय.एस.पी. सोनाली कदम, पी.आय. जैतापुरकर करत आहेत.