Skip to main content

कम्यूनिटी ट्रान्समिशन म्हणजे काय; भारतात कोरोना "स्टेज-3" मध्ये गेलाय का; आरोग्य खात्याने समजावलं "गणित" अग्रवाल म्हणाले.

कम्यूनिटी ट्रान्समिशन म्हणजे काय; भारतात कोरोना "स्टेज-3" मध्ये गेलाय का; आरोग्य खात्याने समजावलं "गणित" अग्रवाल म्हणाले


नवी दिल्ली - कोरोना व्हायरस भारतात कम्यूनिटी ट्रान्समिशन स्टेजला गेल्याची चर्चा सध्या होत आहे. मात्र, आरोग्य मंत्रालयाने याचे खंड केले आहे. यासंदर्भात बोलताना, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी, सध्या देशात कोरोना कम्यूनिटी ट्रान्समिशन नव्हे तर लोकल ट्रान्समिशन स्टेजलाच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.



पुढे अग्रवाल म्हणाले की; सध्या अशी परिस्थिती आहे, की आम्ही कोणत्याही सरकारी कागदपत्रांवर 'कम्यूनिटी' शब्द लिहिला, की लोक त्याचा दुसराच अर्थ लावतात. आम्ही लिमिटेड कॉन्टेस्टमध्ये एका ठिकाणी कम्यूनिटी शब्दाचा प्रयोग केला आहे. मी स्पष्ट करू इच्छितो, की भारत अद्यापही लिमिटेड ट्रान्समिशन स्टेजलाच आहे. आम्हाला वाटलेच, की आपण कम्यूनिटी ट्रान्समिशनकडे जात आहोत, तर आम्ही पुन्हा दुसऱ्यांदा जनतेला आवाहन करू, की आता आणखी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मात्र, अद्याप तशी परिस्थिती ओढवलेली नाही. सध्या जे नियम घालून दिले आहेत त्याचे योग्य प्रकारे पालन केले जावे. एवढेच आमच्यापुढे आव्हान आहे.


देशात आतापर्यंत 1071 जणांना कोरोनाची लागण -
देशात आतापर्यंत 1071 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 29 जणांचा मृत्यू झाल आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झालेले 92 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. आपल्या देशात कोरोना बाधितांची संख्या 100 वरून 1000 वर जाण्यासाठी 12 दिवस लागले आहेत. या तुलनेत इतर देशांत 8000 संक्रमित रुग्ण आढळले आहेत. हे देश विकसित असताना आणि तेथील लोकसंख्या कमी असतानाही एवढे लोक तेथे आढळून आले आहेत. आपल्या देशातील जनतेचे सहकार्य आणि सरकारने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय यामुळेच आपण येथे कोरोना बाधितांची संख्या रोखू शकलो. आपण सोशल डिसटंसिंग आणि लॉक डाऊनचा योग्य पद्धतीने वापर केला आहे, असे ही ते म्हणाले; तसेच मी देशातील जनतेला सांगू इच्छितो, की त्यांनी घालून दिलेल्या नियमांचे योग्य प्रकारे पालन करावे. अन्यथा आज आपण जे यश मिळवले आहे. ते पुन्हा शून्यही होऊ शकतो. यामुळे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करायचे आहे असे अग्रवाल म्हणाले, 


इतर देशांत एका व्यक्तीने शंभहून अधिक लोकांना संक्रमित केले आहे. एवढेच नाही, तर एका संक्रमित व्यक्तीच्या निश्काळजीपणामुळे तेथे कोरोनाने महामारीचे रूप धारण केले आहे. आपल्याला अशा स्थितीपासून देशाला वाचवायचे आहे, असेही अग्रवाल म्हणाले. 


कम्यूनिटी ट्रान्समिशन म्हणजे काय ?
कोरोना व्हायरसच्या संक्रमाणाच्या चार स्टेज असतात. पहिल्या स्टेजमध्ये केवळ प्रभावित देशांतून आलेल्या लोकांमध्येच कोरोना दिसून येतो. संक्रमित देशांतून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संक्रमित होण्याला लोकल ट्रांसमिशन स्टेज, असे म्हटले जाते. जेव्हा परदेशातून आलेल्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याच्या कुटुंबीयांना, नातलगांना संक्रमण होते. या स्टेजला व्हायरस कुठून पसरतो हे समजते. 


तिसरी स्टेजला कम्‍युनिटी ट्रांसमिशन स्‍टेज म्हटले जाते. या स्टेजला एकाच भागातील अधिक लोक संक्रमित होतात. या स्टेजला एखादी व्यक्ती कोरोना संक्रमित देशातून आलेली नसते किंवा तेथून आलेल्या कुण्या व्यक्तीच्या संपर्कातही आलेली नसते. या स्टेजला संबंधित व्यक्ती कुणामुळे संक्रमित झाला हे कळत नाही. चौथ्या स्टेजला संक्रमण संपूर्ण भागात पसरते. या स्टेजमधून सर्वात पहिले चीन गेला आहे.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी ...

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याच नावावर राहतात मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्राला दोन हजार मेगावेट अतिरिक्त वीज मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. तूर्तास या प्रकल्पांमध्ये पनवेल,अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यांमध्ये उच्च वीज वाहक तारा आणि टॉवर्स टाकण्याचे काम पूर्ण झाले असून त्यामधून विद्युत प्रवाह देखील प्रवाही झाला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे या प्रकल्पाकरता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर झाला आहे त्या जमिनी शेतकऱ्यांच्याच नावावरती राहणार आहेत. तारा तसेच टॉवर्स यांच्या खाली शेतकऱ्यांना शेती तथा अन्य व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील जर वृक्षतोड झाली असेल तर त्याचा मोबदला देखील त्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे जमीन धारकांच्या समाधानाचे वातावरण आहे चला पाहूयात काही समाधानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया.

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ

नवीकरणीय ऊर्जा सक्षमतेमुळे मिळणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ २०३० सालापर्यंत ५० टक्के नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करत शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक पाठबळ देण्याचे ध्येय महाराष्ट्र राज्याने डोळ्यापुढे ठेवले आहे. या उद्दिष्ट पूर्तिकरिता खावडा -४ पार्ट सी यांच्या पुढाकाराने गुजरात राज्यातून हरित ऊर्जा महाराष्ट्राला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक अशी ऊर्जा ही तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त देखील आहे. महाराष्ट्राला प्रगतिशील राष्ट्र बनविण्याकरता नवीकरणीय ऊर्जा प्राप्त करणे हे जितके महत्त्वाचे आहेत तितकेच ती ऊर्जा आणण्यासाठी वीज वाहक यंत्रणा उभारणे हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते. म्हणूनच खावडा कॉरिडोर चे माध्यमातून अखंडित नवीकरणीय वीज पुरवठा करणारी यंत्रणा नव्याने उभारण्यात येत आहे. सदर वीज वाहक यंत्रणेद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण तसेच शहरी भागांना अखंडित वीज पुरवठा करणे सोपे जाईल. गुजरात राज्यातून येणारी नवीकरणीय ऊर्जा ही महाराष्ट्राच्या आर्थिक पातळीवर देखील अनन्यसधारण महत्त्व बाळगून आहे. हरित ऊर्जा ही सौर ऊर्जा तसेच पवनचक्की यांच्या माध्यमातून निर्मिली जणार असल्यामुळे पारंपारिक ऊर्...