"जनता कर्फ्यु "?आणि महामाया एकविरापुत्र बुद्ध!आज खऱ्या अर्थाने देशाने बंद पाळला. शासन म्हणून केवळ "आदेश" होते,स्फूर्ती* मात्र कोरोनाच्या भीतीने आलेल्या ""मृत्यूचीच" होती!प्रत्येकजण स्वतःवर प्रेम करतो ,आणि त्यानंतर आपल्या जवळच्या प्रिय माणसांवर!देश आणि राष्ट्रवाद हा त्याही पुढे!नागरिकांच्या मनातील म्र्युत्युची भीती पाहून, त्याचाही फायदा घेऊ पाहणारा मोदी शहांचा "राष्ट्रवाद" कृत्रिम* आहे हे उघड झाले!भारतीय दैववादाचे समर्थन करणारे "कट्टर हिंदुत्ववादी" आज कोरोनाच्या केवळ ,कल्पनेनेच कोमात "गेलेत!या भयंकर परिस्थिला देव आणि कर्मकांडी धर्माची झालर, मोदिभक्तांनी चढवण्या अगोदरच, ती "सामना "या दैनिकातून खासदार संजय राऊत यांनी टराटरा फाडली!त्यांच्या पत्रकारिता आणि खासदारकीच्या, राजकीय जीवनातील हे सर्वात मोठे काम आहे ,असे मी मानतो!"देवांनी मैदान सोडले" ही चर्चा आज सुरू झाली!यात संजय राऊत यांचे वाचन कमी पडले असले, तरी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे ,या मा. मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आजोबांची, आज जाणकार वाचकांना आठवण झाली!ठाकरे परिवार, आई एकविरा भेटीला कार्ला येथे येतो आणि ही आमची" आई "आहे हे वारंवार सांगतो.खरे पाहता आई एकविरा मंदिरासह कार्ला लेणी ही "बौद्ध लेणीच" आहेत हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या अनेक ऐतिहासिक ग्रँथात लिहिलेले आणि जागतिक इतिहासकार ,शासनाच्या पुरात्वीय निष्कर्षातून समोर आलेले सत्य आहे!"गणपती दूध पितो"या जागतिक शोधाचे जनक माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवसेनेसह अख्ख्या देशाला मागे नेले होते ,ती "घोडचूक" सामना ने अर्थात ,संजय राऊत यांनी सुधारली !ती प्राप्त परिस्थितीमुळे!आज साऱ्या जगाचा जीवच धोक्यात आल्यावर देव,देश,धर्म या साऱ्या कल्पनांचा चक्काचूर होऊन, आम्ही सारे मानव म्हणून एक होत आहोत, त्याचे स्वागतच करूया!"जगातले सर्व धर्मीय देव" या कोरोना पासून स्वतःस आणि त्यांच्या भक्तगणास वाचवू शकत नाहीत,त्याच प्रमाणे प्रचंड सैन्य शक्ती असणारी चीन आणि अमेरिकेसारखी बलाढ्य राष्ट्रे, कोरोनाच्या साथीने मरणाऱ्या एकाही नागरिकाला वाचवू शकत नाहीत, हे सत्य जगासमोर आलेय!चर्चा अशीही आहे कोरोनाची निर्मिती ही एकमेकांचे वैर काढताना झालीय. असे हे बलाढ्य देश एकमेकांवर आरोप करतात, हे फारच भयानक आहे!सत्ताधारी" विकृत" मन काय काय करू शकते ?हे आपल्या लेकरावर जीवापाड प्रेम करणाऱ्या मातेलाच समजू शकते!कोरोनाच्या निर्मितीत माणसाच्या शत्रूबुद्धीचा हात आहे ,या संशयाला वाव आहे!म्हणूनच जगातील मानवजातीतील "शत्रुत्व "नाहीसे व्हावे त्यांच्यात मैत्रीचे, बंधुत्वाचे करुणा निर्माण व्हावी ,हे तथागत गौतम बुध्दांच्या धम्मपदांचे प्रमुख सांगणे होते!आज जगाने बुद्ध विचारातील वैश्विक "करुणा"सोडून कोरोनाच्या निर्मितीत आपली "अक्कल" लावली असेल तर विनाश अटळ आहे!हा लेख लिहीत असताना कार्ला येथील बौद्ध लेण्यातील आगरी कोळी भंडारी कराडी यांच्या मातृसत्ताक आई एकवीरेंच्या विचारांचीच आठवण येतेय!छातीत भाला, किंवा बंदुकीची गोळी घुसली तर मरणारा हा "आई ग"हेच शब्द ,भाषा जरी वेगळी असली तरी उच्चारणार असे माझे निरीक्षण आहे!आई एकविरा ही मागील दोन हजार वर्षाची"मातृसत्ताक विचारधारा "आहे!ठाकरे परिवाचा इतिहास मला माहित नाही!परंतु मुबंई ठाणे रायगड आणि कोकणातून मातृसत्ताक सागरपुत्र आणि आई मातृसत्ताक एकविरा संस्कृतीने, त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत आणलंय हे अतिशयोक्तीचे होणार नाही!बौद्ध लेण्यांना पेशवाईच्या सत्तेच्या प्रभावात, "बौद्ध लेणी "म्हणणारे "प्रबोधनकारच" असू शकतात,ती हिम्मत बाकी कुणामध्ये नाही!आज संजय राऊत प्रबोधनकार यांच्या पायाजवळ पोहचले!ठाणे रायगड मुबंई हा सागरपुत्र आगरी कोळी कराडी भंडारी लोकांचाच प्रदेश, त्यास 2500 वर्षांपासून "अपरांत"म्हटले जात असे .येथे बौद्ध लोकांच्या मोठ्या वसाहती होत्या,येथील खाड्या बंदरे येथून जागतिक व्यापार चालायचा.बौद्ध लेणी आणि जागतिक सागरी व्यापार यांचे घनिष्ठ समंध होते!असे रायगड गॅझेट सांगते!सम्राट अशोकाने बुद्धाच्या विचाराने, साम्राज्य उभे करून देशात 84000 बौद्ध स्तूप बांधले होते!आज मनुस्मृतीच्या टिकेने हे सर्वांनाच माहीत झालेय की, या देशात स्त्रियांना सर्व प्रकारचे अधिकार नाकारून गुलाम करणारे लोक हेच आपले वैदिक मनुवादी लोक होते ज्यांनी देव उभा करून लोकांना सांगितले होते ,तुमचे रक्षण देव ,देवळे आणि त्यांतील धर्म करील,वास्तव असे आहे दिवसभर पोलीस,डॉक्टर,दवाखानेच उघडे आहेत, बाकी सारे गायब झालेत!बधुनो समस्त स्त्रिया मनुस्मृतीच्या गुलाम झाल्या असल्या तरी कोळीवाडा आगरवाडा ,भंडारी कराडी गावठाणात त्या कोयते काती घेऊन मासे कापत, विकत होत्या आणि त्याच शस्त्राने स्वतःच्या शिलाचे आणि आपल्या गावाचेही रक्षण करीत होत्या हीच कोळीवड्याची शान होती आणि आहे,किंबहुना आजही त्या तेव्हढ्याच खंबीर आहेत!लग्नात हुंडा देणार नाही !आणि घेणार नाही, ही संस्कृती आगरी कोळी समाजाची!पुढे जाऊन लग्नाच्या स्त्री पुरोहित म्हणजे "धवलारीन" होण्याचा , होण्याचा मान फक्त या मातृसत्ताक एकविरा संस्कृतीतच दिसतो!हे विस्ताराने सांगायचे कारण हा विचार आहे जगाला तारण्याचा!मी नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानततळात केरुमाता बौद्ध** लेण्या वाचविण्याचे, जे आंदोलन सुरू केलेय, ते हा मातृसत्ताक विचार जपण्यासाठीच!केरुमाता,एकविरा,जीवदानी माता ही मुंबईची मातृसत्ताक संस्कृती !ती मनुस्मृतीच्या विरोधी आहे!ती बौद्ध विचारांचीच आहे!तो विचार भारताच्या वैभवाचा आणि सागरपुत्राच्या वैभवाचा आहे!आज देवांच्या रांगेत बुद्धांना बसविण्याची चूक संजय राऊत यांनी केली!बुद्ध स्वतःस देव**** मानीत नव्हते!ते चमत्कार,स्वर्ग,व्यक्तिपूजा,नरक,पुनर्जन्म मानीत नव्हते!त्यांचे थोडक्यात विचार ..****कोणत्याही गोष्टींवर नुसत्या ऐकण्याने विश्वास ठेवू नका.!...**तुमच्या अनेक पिढ्यानी चालत आलेल्या, परंपरागत चालीरीती आहेत,म्हणून त्यांवर तुम्ही विश्वास ठेवू नका..….**अनेक बोलतात व कित्येक लोक त्याचा प्रसार करतात म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.……तुमच्या धर्मगग्रँथात लिहिले आहे म्हणून एखाद्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका...एखादी गोष्ट तुमच्या आदरणीय गुरू आणि वरिष्टांणी सांगितली आहे,म्हणून तिला प्रमाण मानून त्यावर विश्वास ठेवू नका.परंतु एखादी गोष्ट,जी निरीक्षण आणि परीक्षण करून कारणासहीत मान्य होते आणी एक व अनेकांच्या चागल्या व भल्यासाठी उपयोगी ठरते,तीच गोष्ट मान्य करून तिचे अनुसरण करा..***महामाया एकविरापुत्र बुद्ध!यांचा हा विज्ञानवादी विचार ज्या देशांकडे आज आहे त्याच्याकडे मोठया प्रमाणात संशोधक,प्रयोगशाळा,दवाखाने औषधें आहेत,आम्ही देवळे ,नवस,तेहतीस कोटी देव असूनही "असहाय" आहोत!मला आशा आहे ,आपण आपल्या आईची आठवण करून सांगा, या साऱ्या मांनवजातीवर आपले प्रेम नसेलही कदाचित परंतु प्रत्येक आईचे किती प्रेम आहे आपल्या मुलांवर ,ते घरा घरात पहा!केरुमाता, जीवदानी माता ,एकविरा माता या मातृसत्ताक तत्वज्ञानाचे ,स्त्री पुरुष समतेचे प्रवर्तक बुद्ध या देशाला आणि जगाला शत्रुत्व*** भावनेतून निर्माण झालेल्या "कोरोना" पासून मैत्री आणि" करुणा "***या विचारांनी वाचवू शकतात!म्हणूनच घरातच थांबून संसर्ग टाळणे हा खरा उपाय आहे!नवसाचा देव,नवसाची मंदिरे ओस पडली!आता आरोग्यासाठी डॉक्टर आणि तुमच्या शरीरातील प्रतिकार शक्ती आणि तुमचे खंबीर विज्ञानवादी मनच आपणाला आणि जगाला वाचवू शकते!आपणच आपल्या जगण्याचे रक्षणकर्ते,!अत्त दीप भव.
(लेख : राजाराम पाटील - सामाजिक कार्यकर्ते शेतकरी प्रभोधिनी)