न्यूईरा हॉस्पिटल्समध्ये प्रगत दंत उपचार विभागास सुरुवात; सर्व मौखिक समस्यांवर एकाच छताखाली मिळणार उपचा
न्यूईरा हॉस्पिटल्समध्ये प्रगत दंत उपचार विभागास सुरुवात; सर्व मौखिक समस्यांवर एकाच छताखाली मिळणार उपचार नवी मुंबई (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे): रुग्णसेवेला अधिक व्यापक व दर्जेदार स्वरूप देण्याच्या दिशेने न्यूईरा हॉस्पिटल्सने आपल्या रुग्णालयात प्रगत दंत उपचार विभाग सुरू केला आहे. या नव्या विभागामार्फत ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जरीसह संपूर्ण दंत उपचार सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.हा नवीन विभाग आधुनिक पायाभूत सुविधा, प्रगत उपकरणे आणि अनुभवी तज्ञांच्या टीम एकत्र आणत सर्वसमावेशक दंत सेवा प्रदान करते. नियमित दंत तपासणीपासून ते गंभीर मौखिक आणि मॅक्सिलोफेशियल( जबडा) शस्त्रक्रिया पुरवते ज्यामुळे नवी मुंबईरचकरांना आता अत्याधुनिक दंतसेवेचा लाभ घेता येणार आहे. श्री शशिकांत चांदेकर(वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाशी पोलीस स्टेशन) यांच्या हस्ते या अत्याधुनिक विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. विनोद विज(वरिष्ठ प्लास्टिक सर्जन) आणि डॉ. कोपल विज(ओरल ॲण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जन) यांची प्रमुख उपस्थिती होती. नव्याने सुरू झालेल्या या विभागात प्रतिबंधात्मक दंतचिकित्सा, कॉस्मेटिक दंतचिकित्सा, ...