स्ट्रोकने पिडीत रुग्णांना मिळणार ‘गोल्डन अवर‘ मध्ये उपचार खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ नवी मुंबई (प्रतिनिधी/रूपाली वाघमारे): बदललेली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अलीकडच्या काळात ब्रेन स्ट्रोकच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. स्ट्रोक म्हणजे पक्षाघात , याला ब्रेन अटॅक असंही म्हटलं जातं. जेव्हा मेंदूमध्ये एखादी नस ब्लॉक होते, तेव्हा ब्रेन स्ट्रोक येतो. ही एक जीवघेणी स्थिती आहे; ज्यावर वेळीच उपचार केला नाही, तर मृत्यूही होऊ शकतो. यावर योग्य वेळी उपचार केल्यास रक्तवाहिनी मधील अडथळा दूर केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊशकतो. परंतु त्यासाठी मेंदूच्या पेशी मृत होण्याआधीच जलद उपचार मिळणे अत्यंत गरजेचे आणि लक्षात घेऊन नवी मुंबईतील खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलने स्ट्रोक युनिटला सुरूवात केली आहे. या शुभारंभ प्रसंगी नवी मुंबईचे आयपीएस आणि सहपोलीस आयुक्त श्री संजय येनपुरे उपस्थित होते. या युनिटमध्ये सीटी-एमआरआय चाचणी, थ्रोम्बोलिसिस आणि थ्रोम्बेक्टॉमी सारखी प्रगत तंत्रज्ञ...