कर्करोगाला मात दिलेल्यांसाठी अपोलो चा 'कॅन विन' सदैव सोबत... 'कॅन विन' सपोर्ट ग्रुप कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासात सर्वांना एकत्र जोडतो... नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): राष्ट्रीय कॅन्सर सर्व्हायव्हर्स महिन्याचे औचित्य साधून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, अपोलो कॅन्सर सेंटर (एसीसी) ने 'कॅन विन' सुरु करण्याची घोषणा आज केली. एक कर्करोग समर्थन ग्रुप जो कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासात असलेल्या सर्वांना एकत्र जोडतो. 'सामायिक शक्ती जीवन बदलू शकते' या विश्वासावर आधारित 'कॅन विन' समूह कोणत्याही एका ब्रँडपुरता मर्यादित नाही. या मंचावर ऑन्कोलॉजिस्ट, सायको-ऑन्कोलॉजिस्ट, रुग्ण, कर्करोगातून वाचलेल्या व्यक्ती, रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती आणि स्वयंसेवकांना एकत्र आणले जाते. सहानुभूती, समर्थन आणि सामायिक भावनेतून काम करणारा एक दयाळू समुदाय तयार करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हा फक्त एक समूह नाही तर बोलण्यासाठी, ऐकण्यासाठी, शिकण्यासाठी आणि बरे होण्यासाठी एक सुरक्षित जागा आहे. आजाराचे नुकतेच निदान झाले असेल, उपचार घेत असाल किंवा दुसऱ्या कोणाची काळजी घ...