Skip to main content

Posts

Showing posts from January, 2025

मुंबई ऊर्जा मार्ग लि. जपत आहेत सामाजिक बांधिलकी, सी एस आर फंडातून साकारले लोकाभिमुख उपक्रम

मुंबई ऊर्जा मार्ग लि. जपत आहेत सामाजिक बांधिलकी, सी एस आर फंडातून साकारले लोकाभिमुख उपक्रम ठाणे (प्रतिनिधी):-  भारताच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने हाती घेतलेल्या ऊर्जा सक्षमीकरणाच्या अभियानात महत्त्वाची भूमिका बजावणारे मुंबई ऊर्जा मार्ग ली. व्यवस्थापन विविध लोकाभिमुख उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. त्यांच्या माध्यमातून नुकतेच अंबरनाथ तालुक्यातील कासगाव जिल्हा परिषद शाळेला महिलांसाठी शौचालय बांधून देण्यात येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात अतिरिक्त वीजपुरवठा मिळवून देण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग ली. अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत असल्यामुळे या आस्थापनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. तासगाव जिल्हा परिषद शाळेत 170 विद्यार्थी शिकत असून त्यापैकी 83 विद्यार्थिनी आहेत. या शाळेत महिलांसाठी वेगळे शौचालय नव्हते. मुली तसेच महिला शिक्षक वृंद यांच्यासाठी अत्यंत गैरसोय होत होती. शाळा व्यवस्थापन समितीने मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड यांच्याकडे महिलांसाठीचे वेगळे शौचालय बांधून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला. मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड कंपनीच्या वतीने विना विलंब य...