शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख श्रमिका दळवी यांची जिल्ह्यात पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात..!
शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख श्रमिका दळवी यांची जिल्ह्यात पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात..! सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :- शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुखाचा पदभार स्वीकारुन श्रमिकाताई दळवी यांनी जिल्ह्यात पक्षबांधणीच्या कामाला जोरदार सुरुवात केली आहे, दि. १५ डिसेंबर पासून त्यांनी जिल्ह्यातील हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन विविध विषयावर चर्चा केली, तर काही सामाजिक प्रकल्पांना भेटी देऊन विस्तृत माहिती जाणून घेतली. शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुखाची जबाबदारी श्रमिकाताई दळवी यांच्यावर नुकतीच सोपवली आहे. त्याचा फायदा तळागाळातील जनतेच्या हितासाठी करणार असल्याचे श्रमिकाताईंनी सांगितले आहे. संपर्कप्रमुख श्रमिकाताई दळवी यांनी जिल्ह्यात दाखल होऊन देवगड, मालवण, वैभववाडी, कणकवली या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, शिवाय शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे शिवसेना संपर्क कार्यालयांना ...