नवी मुंबई राष्ट्रवादी युवकचे निषेध आंदोलन : नवी मुंबई ( प्रतिनिधी ) : वेदांतागृप व फोक्सकॉन कंपनी च्या माध्यमातुन सुमारे १ लाख ५८ हजार कोटी रूपयाची गुंतवणूक होणार होती त्या संदर्भात जुलै २०२२ पर्यंत चर्चा सुरू होती. परंतु हीच गुंतवणुक गुजरात राज्यात करण्याचा निर्णय भाजप-शिंदे सरकारने आपल्या दुटप्पी कारभाराने घेण्यास भाग पाडले आहे. सदर प्रकल्प गेल्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १ ते १.५९ लाख तरुणांना मिळणारा रोजगार गेला आहे. तसेच महाराष्ट्र राज्याला आर्थिक दृष्ट्या मजबुत होण्यासही मदत झाली असती. सदर प्रकल्प पुन्हा राज्यात आणण्यासाठी फोक्सकॉन -वेदांत गृप यांना निमंत्रीत करावे. तसेच अशा असंवेदनशील सरकार च्या निष्काळजीपणामुळे ईथुन पुढे महाराष्ट्रविरोधी कृती घडल्यास राज्यातील युवक तीव्र आंदोलन करून सरकार ला बेजार करू अशा आशयाचे निवेदन विभागीय कोकण आयुक्त बेलापूर येथे देण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस श्री प्रशांत पाटील साहेब, प्रदेश उपाध्यक्ष तथा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री नामदेव भगत साहेब, नवी मुंबई कार्याध्यक्ष श्री जी एस पाटील साहेब, प्रदेश युवक सचिव श्री रेहमान स...