महाराष्ट्रा पोलीसांच्या अन्याया बाबत न्यायर्त पोलीस पत्नीचे आमरण उपोषण 15 ऑगस्ट 2022 रोजी आजाद मैदान येथे:
महाराष्ट्रा पोलीसांच्या अन्याया बाबत न्यायर्त पोलीस पत्नीचे आमरण उपोषण 15 ऑगस्ट 2022 रोजी आजाद मैदान येथे: नवी मुंबई ( प्रतिनिधी) : नवी मुंबई उलवे येथे राहणार्या संगीता डवरे त्यांचे पती पोलीस शिपाई हणमंत शंकर डवरे हे दिनांक 12 फेब्रुवारी 2022 रोजी टि. एस. चाणक्य, पाम बीच रोड सिग्नल वर कार्यातंर्गत कार्यरत असताना इनोवा क्रिस्टा गाडी नंबर MH 43 BE 9789 ह्या गाडीचा मालक हा स्वतः दारूच्या नशेत गाडी चालवत त्यांनी त्यांच्या पती पोलीस कर्तव्य बजावत असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास दारू पिऊन सुसाट गाडी चालवणारे गाडी मालक तथा त्यांचे ड्रायव्हर यांनी हणमंत डवरे यांच्या अंगावर चार चाकी गाडी घालून जिवंत मारण्याचा प्रयत्न केला. त्या नंतर अपघात झाल्यावर जखमीस घटनास्थळी सोडून हॉस्पिटलमध्ये न नेता, गाडी सुसाट वेगाने घेऊन गाडी चालक तथा मालक फरार झाले. त्यामध्ये त्यांच्या पतीचे हात आणि पाय दोन्ही फॅक्चर, भरपुर मार लागला, त्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी अपोलो हॉस्पिटल बेलापूर येथे M.I.C. केस नंबर 2974/2022 नुसार उपचार साठी ऍडमिट केले. परंतु अपोलो हॉस्पिटल व त्यांचे प्रमुख डॉक्टर प्रशांत अग्रवाल यांनी प...