धक्कादायक बातमी : बचपन का प्यार’ गाण्याने जगाच मन जिंकणाऱ्या सहदेवचा अपघात; डोक्याला गंभीर मार: "बचपन का प्यार’ या गाण्याने प्रसिद्ध झालेला छत्तीसगढ़ी मुलगा सहदेव दिरदो मंगळवारी २८ डिसेंबर रोजी एका अपघातात जखमी झाला आहे. हा अपघात शबरीनगर येथे झाला आहे. सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. नवी मुंबई (प्रतिनिधी) :- सहदेव वडिलांसोबत दुचाकीवरून कुठेतरी जात होता. दुचाकीवर 3 जण होते. सहदेव मागे बसला होता ते शबरीनगरजवळ पोहोचले असता दुचाकी स्लीप झाली आणि सर्वजण खाली पडले. या अपघातात सहदेव गंभीर जखमी झाला आहे. दुचाकीवरील अन्य दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत. सहदेवला तातडीने सुकमा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, त्याला जगदलपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. सहदेवच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. अपघाताची माहिती मिळताच सुकमाचे जिल्हाधिकारी आणि एसपीही जिल्हा रुग्णालयात पोहोचले. बादशाहने सहदेवच्या गाण्याचे रिमिक्स बनवले- छत्तीसगडमधील सहदेवचे ‘बचपन का प्यार भूल नहीं जाना रे’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. नक्षलग्रस्त भागातील पें...