न्यूज अपडेट: अनुसूचित जमातीच्या मुलींना शिक्षणासाठी देण्यात येणारी “पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना” फक्त कागदावरच..!!
न्यूज अपडेट: अनुसूचित जमातीच्या मुलींना शिक्षणासाठी देण्यात येणारी “पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना” फक्त कागदावरच..!! ● वसतिगृहमध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या मुलींना शिक्षणासाठी देण्यात येणारी “पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना ” फक्त कागदावरच दिसत आहे. पनवेल (प्रतिनिधी) :- सदरील योजनेची सन 2020-2021 व सन 2021-22 या दोन्ही वर्षाच्या निधीचा लाभ विद्यार्थिनींना अद्याप झालेला नाही. वारंवार कार्यालयात चकरा मारून देखील कोणतीच भूमिका घेतली जात नाही. सतत चाल ढकल करून आठ दिवसात पैसे विद्यार्थिनीच्या खात्यात जमा होतील. आमचे प्रयत्न चालू आहेत अशा प्रकारची निरर्थक आश्वासने देण्यात आली आहेत. आज कॉलेज ऑफलाइन पद्धतीने सुरू होत आहेत. विद्यार्थिनींचे प्रॅक्टिकल चालू झाले आहेत. अशा परिस्थितीत डहाणू , जव्हार , विक्रमगड , मोखाडा , वाडा , तलासरी या भागात राहणाऱ्या विद्यार्थिनींना रोजचा प्रवास करून येणे कसे शक्य नाही. वसतिगृहात प्रवेश नाही शिवाय हक्काचा सहाय्यक निधी नाही. बाहेर रूम घेऊन राहायला या मुलींकडे पैसे नाहीत. मागासवर्गीयांनी शिक्षण घेऊच नये अशी यंत्रणा उभी केली जात आहे. आज आदिवासी मुल...