ब्रेकिंग न्यूज : राज्यात डेल्टा प्लसच्या वाढत्या आजारामुळे अनलॉक मध्ये महत्त्वपूर्ण बदल..!! नवी मुंबई (प्रतिनिधी/अनंत गोळे) :- आज राज्यभरात कोरोना दुसरी लाट ओसरल्यानंतर महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण सध्या स्तिथि पाहता २ ते ३ आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्याच पाठोपाठ आता कोरोनाचे नवीन रूप डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे राज्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. डेल्टा प्लसचे रुग्ण काही जिल्ह्यांत आढळून आल्याने आणि त्याची संख्या हळूहळू वाढू लागल्यामुळे काही प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले जाण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आता आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर केले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात ४ जून रोजी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार ५ गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी करण्यात आली होती. यामध्ये त्या त्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड ऑक्युपन्...